महाशिवरात्री यात्रेतून तीन मुली गायब...! अपहरण झाल्याचा पालकांना संशय
हिमायतनगर(वार्ताहर)श्री परमेश्वर मंदिराच्या महाशिवरात्री यात्रेतून तीन अल्पवईन मुली गायब झाल्या असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मुलींचे अपहरण झाले असल्याचा पालकांनी संशय व्यक्त केली असला तरी पोलिस मात्र अपहरण झाले नसल्याचे सांगत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर येथील गणेशवाडी येथे राहणारी कु.सोनुबाई नागोराव सोनेवाड हि १५ वर्षाची अल्पवईन मुलगी व तिच्या मैत्रिणी कु.रेणुका कैलास पवार वय १६ वर्ष, आणि कुसुम कैलास पवार वय ८ वर्ष रा.परमेश्वर गल्ली हिमायतनगर या तिघी जनी दि.२८ फेब्रवारी रोजी दुपारी ३ वाजता यात्रेत झोका खेळण्यासाठी गेल्या होता. तेंव्हा कु.सोनुबाई हिचे वडील नागोराव सोनेवाड यांच्याशी तिची भेट झाली. यात्रेत फिरू नको असे म्हणत वडील नागोराव सोनुबीवर रागावल्याने ती घरी जातो म्हणून निघाली परंतु रात्री उशिरापर्यंत घरी पोंचलीच नाही. त्यांनी नातेवाईकाकडे शोध शोध केली, परंतु दोन दिवस उलटले तरी या तिघी सापडल्या नसल्याने श्री सोनेवाड यांनी हिमायतनगर पोलिस स्थानकात फिर्याद देऊन अज्ञात व्यक्तीने मुलींचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला आहे.
अपहरणाची शक्यता नाही...पोलिस
--------------------------
बेपत्ता मुलीच्या पालकाने अपहरणाची फिर्याद दिली असली तरी संबंधित मुली रागाने घरून निघून गेल्या असल्याचा अंदाज पोलिस बांधत आहेत. अपहरण झाल्याची शक्यता फेटाळून लावली आहे. एकदाच तीन मुली बेपत्ता होण्याचे प्रकरणी पोलिस मात्र फारसे गांभीर्याने घेताना दिसून येत नसल्याने महिला मुली व लहान मुलांची सुरक्षा रामभरोसे झाल्याचे नागरीकातून बोलले जात आहे.