NEWS FLASH १) पाण्यात बुडाल्याने तीन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू,.....२) स्वस्त धान्य दुकानदार अपंगांची फसवणूक करीत आहे,......३) खतांचा पुरवठा त्वरित करा, अन्यथा भाजपच्या वतीने जनआंदोलन - संदीप केंद्रे,.....४) राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के दरवर्षी प्रमाणे मुलींची बाजी,...५) 1 लाख 72 हजारांच्या दागिन्यांसह चोरटा स्थागुशाने पकडला,.....६) लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणार्‍यावर गुन्हा दाखल,.....७) कॉन्वेजीनियसचा १०० दशलक्ष विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी पुढाकार,.....८) कोरोना बाधितांचा मृत्यूदर रोखण्यासाठी घरनिहाय सर्वेक्षणावर भर - डॉ. विपीन,....९) कोरोना विषाणूने दीड शतकाजवळ दिले नवीन रुग्ण, आज १३४ बाधीत रुग्ण; नांदेड शहरात ४६; ग्रामीण भागात ८८,.....१०) साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, ..., **

सोमवार, 16 मार्च 2015

५९ लाखाचा गुटखा जप्त

देगलूर नाका भागातील गोदामावर छापा;
५९ लाखाचा गुटखा जप्त  


नांदेड(खास प्रतिनिधी)शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटखा अवैधरित्या विक्री सुरु असून परराज्यातून येणारा गुटख्याचे प्रमुख केंद्र नांदेड ठरले असल्यामुळे या धंद्यात लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. विविध सामाजिक संघटना व अनेक पक्षांनी गुटखा बंद करावा अशी मागणी करुन देखील त्याकडे अन्न व औषध प्रशासन, स्थानिक गुन्हा शाखा, पोलिस प्रशासन त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. सोमवारी झालेल्या कार्यवाहीत तब्बल ५९ लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. 

नांदेड शहर हे गुटखा विक्रीचे केंद्र बनले असून परराज्यातून येणा-या गुटख्याची मोठ्या प्रमाणात साठवणूक होत आहे आणि मग येथूनच नांदेड जिल्ह्यातील तालुक्यासह ग्रामीण भागामध्ये या गुटख्याचे वितरण होत आहे. किंबहुना पर जिल्ह्यात देखील येथूनच गुटख्याचा पुरवठा होत आहे. देगलूरनाका भागात शेख अफजल हा गेल्या अनेक महिन्यापासून गुटख्याची साठवणूक करीत होता व येथूनच आपले जाळे त्याने पसरविले होते. लाखो रुपयांचा गुटखा त्याने गोदामात ठेवला होता. गुटखा बंद करुन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सोमवारी दुपारी जिल्हाधिका-यांची भेट घेवुन केली होती. या शिष्टमंडळाला जिल्हाधिका-यांनी गुटख्यावर कारवाई होईल असे आश्वासन देखील दिले होते. दुपारी ३ वाजता अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक गुन्हा शाखेच्या वतीने देगलूरनाका भागातील शेख अफजल यांनी साठवणूक केलेल्या गोदामावर संयुक्तरित्या छापा टाकून ५० लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला. यात जरनीगंधा, गोवा, पानमसाला, सितार, आरएमडी आदींचा समावेश आहे. या प्रकरणी इतवारा पोलिस ठाण्यात आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद करुन आरोपींला अटक करण्यात आली आहे. 

दरम्यान जिल्ह्यात गुटखा बिनदिक्कतपणे सुरु असून पानटपरीवर सहजपणे गुटखा उपलब्ध होत आहे. यासंदर्भात कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे कायदा असूनही कायद्याची अंमलबजावणी करण्यास दिरंगाई होत आहे त्यामुळेच लहान पानटपरी धारकांपासून ते मुख्य एजन्टापर्यंत या कायद्याचा कोणताही धाक राहिलेला नाही. त्यामुळे दिवसेंदिवस या गटख्याची विक्री वाढत असून तरुणपिढी या गुटख्याच्या व्यसनाधिन होत आहे. आता जिल्हाधिका-यांनीच अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
अपघात

ट्रेव्हल्स स्कुटी अपघातात एक ठार.. दोन जखमी 

नांदेड(खास प्रतिनिधी) नांदेड - लातूर महामार्गावरील ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्या-लयातील द्वितीय वर्षात शिक्षण घेणा-या एका विद्यार्थ्याच्या स्कुटीला ट्रॅव्हल्सने जबर धडक दिल्यामुळे विद्यार्थी जागीच ठार झाला तर अन्य दोनजण जखमी झाल्याची घटना सोमवारी दि.१६ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. 

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना वाघलवाडा येथील कृषी अधिकारी प्रकाश पवार यांचा एकुलता एक मुलगा शुभम पवार हा विष्णुपुरी जवळ असलेल्या ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. तो सकाळी खाजगी शिकवणीसाठी नांदेडकडून विष्णुपुरीकडे स्कुटी नंबर एम.एच.२६- ए.एल.९३५० वर बसून मित्रा सोबत जात असतांना लोह्याकडुन भरधाव वेगात येणारी ट्रॅव्हल्स नंबर एम.एच.१४- बी.ए.९९६७ च्या चालकाने जोरदार धडक दिली. या घटनेत शुभम प्रकाश पवार याचा छाती, डोक्याला गंभीर मार लागला. तर स्कुतीवरील अन्य दोन विद्यार्थ्यांना सुद्धा गम्बीर दुखापत झालि. तातडीने या सर्वाना नांदेड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान उपचार सुरु असताना शुभमचा मृत्यू झाला तर अन्य दोघांवर उपचार सुरु आहेत. अपघात घडल्यानंतर काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल होऊन प्रथम  वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली. या भागात मागील अनेक महिन्य्पासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी विष्णुपुरी भागात एसजीजीएस, सहयोग, ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालय, स्वारातीम विद्यापीठ या ठिकाणी गतिरोधक बसवावे अशी मागणी विद्यार्थी वर्गातून करण्यात येत आहे.

रविवार, 8 मार्च 2015

बिरसामुंडा अव्वलहिमायतनगर(अनिल मादसवार)वाढोण्याचे जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्र्वर मंदिर यात्रा महोत्सवात आयोजित कब्बडी स्पर्धेच्या दरम्यान आवकाळी पाउस झाल्याने हि स्पर्धा लांबणीवर पडली होती. ती स्पर्धा दि.०८ रविवारी संपन्न झाली असून, या स्पर्धेत हिमायतनगर आदिवासी वस्तीग्रहातील युवकांच्या बिरसा मुंडा संघाने विजय प्राप्त करून आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी ठेवलेल्या ११ हजार १११ रुपयाचे बक्षिसाचे मानकरी ठरले आहे.

भारतीय खेळात प्रामुख्याने महत्व असलेल्या कब्बडी स्पर्धा महाशिवरात्र यात्रेत दि.२७ फेब्रुवारी रोजी दुपारी सुरु करण्यात आली होती. परंतु अचानक स्पर्धा सुरु असताना अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने खेळ बंद करण्यात आले. त्यानंतर दि.०८ मार्च रविवारी रखडलेली कब्बडी स्पर्धा ठेवण्यात आली होती. ११ वाजता मंदिर समितीचे उपाध्यक्ष महाविर्चंद श्रीश्रीमाळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येउन सुरु झाली होती. तळपत्या उन्हात दिवसभर चाललेल्या या स्पर्धेत हदगांव, हिमायतनगर,किनवट , माहुर, हदगाव, उमरखेड, आदीसह अनेक तालुक्यातील एकुन २४ क्रीडा संघानी सहभाग नोंदवीला होता. सायंकाळी ६ वाजेला संपन्न झालेल्या अंतिम सामन्यात बिरसा मुंडा क्रीडा संघ हिमायतनगर व रामेश्वर तांडा क्रीडा संघ यां दोघांच्या तुल्यबळ लढतीत झाला. या स्पर्धेत हिमायतनगर येथील बिरसा मुंडा क्रीडा संघ आदिवासी मुलांचे वास्त्रीगृह यांनी रामेश्वर तांडा संघास धूळ चारवीत प्रथम क्रमांकाची बाजी मारली. या विजयी संघास 11111/- रुपयाचे बक्षीस महाविरचंद श्रीश्रीमाळ व राजेश्वर चिंतावार यांच्या हस्ते देण्यात आले. दुसर्‍या क्रमांकाचे पारीतोषीक रामेश्वर तांडा संघास रुपये 7001/- रुपयाचे बक्षीस देण्यात आले. तिसरा क्रमांकाचे पारितोषीक रुपये 4001/- दिपजल क्रीडा संघ सिंदगी यांना देण्यात आले. यावेळी कब्बडीचे पंच म्हणुन क्रीडा समीतीचे अध्यक्ष ऍड दिलीप राठोड, सचिव के.बी.शन्नेवाड, सोनबा पवार, बाबुराव बोड्डेवार, बी.आर.पवार, पावडे सर, ताड्कुले सर, विठ्ठल पार्डीकर, चव्हाण सर, सोमवंशी सर, परशुराम राठोड, यांनी काम पहिले. गुनलेखक म्हणून वाय.एन.गवंडी, एम.जी.बॉरेवाड, प्रभाकर हातमोडे आदींनी काम पहिले. यावेळी मंदिराचे संचालक विठ्ठलराव वानखेडे, अनंता देवकते, माधव पाळजकर, पापा पार्डीकर, प्रकाश साबळकर, सुभाष पाटील, प्रकाश जैन, अनिल मादसवार, वसंत राठोड, धम्मा मुनेश्वर, आदीसह क्रीडा प्रेमी नागरीक व खेळाडु हजारोच्या संख्येने उपस्थीत होते.

स्वच्छतेचा संदेश

एकलव्यस्टडीच्या विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश

हिमायतनगर(वार्ताहर)एकलव्य स्टडी सर्कलच्या चिमुकल्या विद्यार्थी - विद्यार्थ्यांनी हातही झाडू घेवून शहरातील बस स्थानक परिसरात सफाई करून स्वच्छतेचा संदेश दिला आहे. त्यांचा हा उपक्रम प्रशासकीय अधिकारी व ग्रामपंचायतीला लाजवेल असा यशस्वी झाल्याने त्याचं सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या स्वच्छतेचा संदेश लक्षात घेत शासकीय - निमशासकीय कार्यालयात मोठा गाजावाजा करत अमलात आणत स्वच्छ सुंदर व निरोगी शहर बनविण्याचे प्रयत्न केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर हिमायतनगर येथील परमेश्वर मंदिर कॉम्प्लेक्स येथील एकलव्य स्टडी सर्कल क्लासेसचे संचालक एन.टी.सर कामारीकर यांनी शिक्षनाबरोबर विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविने यासह स्वच्छतेचे धडे दिले जात आहे. त्यांच्या मार्गदर्शनाला प्रतिसाद देत दि.०८ रविवारी सकाळी ७ वाजल्य्पासून परमेश्वर मंदिर परिसरात हाती झाडी घेऊन आम्ही सुद्धा स्वच्छतेत मागे नाही हे दाखवून देत परिसरातील केर - कचरा साफ करीत स्वच्छतेची चळवळ गतिमान करण्याचा संदेश दिला आहे. 


चिमुकल्यांनी केलेल्या या स्वच्छतेच्या कार्याने बसस्थानक परिसर चकाचक झाला असून, अशीच स्वच्छता नेहमी परिसरात रहावी यासाठी स्थानिक ग्रामपंचायत व मंदिर समितीने लक्ष द्यावे अशी रास्त अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. तसेच चिमुकल्यांनी शहाण्या सुरत्या नागरिकांना परिसर स्वच्छ - सुंदर करून शहरवासियांना दिलेल्या संदेशाचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. 

गुरुवार, 5 मार्च 2015

दोन रेतीचे ट्रेक्टर जप्त

तलाठी रातोळीकरांच्या धडक कार्यवाहीत दोन रेतीचे ट्रेक्टर जप्त 


हिमायतनगर(वार्ताहर)मौजे एकंबा कोठा पैनगंगा पत्रातून लाखोची रेती चोरी होत असल्याचे नांदेड न्युज लाइव्हने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दाखल घेवून तहसीलदार यांच्या सूचनेवरून तलाठी रातोळीकर यांनी दि.०६ मार्च रोजी सकाळीच धडक कार्यवाही केली. यात विदर्भातील दोन ट्रेक्टर चोरट्या मार्गाने रेती वाहतूक करताना ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात जमा केल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.

विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीतील अल्प पाणी असलेल्या कोरड्या नदी पत्राचा फायदा घेत रेती तस्करांनी प्रशासनाला लाखोचा गंडा घालत रेतीचा अवैद्य रित्या उपसा सुरु केला आहे. परिणामी पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आणि शासनाचा लाखोचा बुडत असलेला महसुल असे दुहेरी नुकसान या रेती तस्कराकडून होत असल्याचे वृत्त लिलाव न झालेल्या पेंडावरून सर्रास रेतीचा उपसा सुरु...या मथळ्याखाली नांदेड न्युज लाईव्हने दि.०५ मार्च रोजी प्रसारित केले होते. या वृत्ताची तातडीने दखल घेत तहसील प्रशासन खडबडून जागे झाले. आणि काल रात्रीपासून रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी रेती घाटावर पाळत ठेवली. त्यावरून दि.०६ मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान विदर्भातील बोरी आणि चातारी येथील दोन रेती तस्करीचे ट्रेक्टर पकडून कार्यवाही करत तहसील कार्यालात जमा केले. यात ट्रेक्टर क्रमांक एम.एच.२९ -ए के २५५ चा मालक बालाजी उत्तम माने, चालक अनंता माने रा.चाथारी ता.उमरखेड आणि ट्रेक्टर क्रमांक एम.एच.२९ - व्ही १४ राजू दत्त माने, चालक संदीप माने रा.बोरी, ता.उमरखेड हे चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक करताना आढळून आल्याने तलाठी रातोळीकर यांनी कार्यवाही करून तसा पंचनामा केला आहे.

प्रत्येकी १२ हजारचा दंड लावला 
-----------------------------
आज दोन वाहने रेतीची वाहतूक करताना पकडण्यात आली असून, पकडलेल्या वाहनधारकांना प्रत्येकी १२ हजार ४०० असे एकूण २४ हजार ८०० रुपयाचा दंड लावण्यात आला आहे. वाहन मालकांनी दंड न भरल्यास संबंधितावर पोलिसात कार्यवाही करण्यात येईल. तसेच एकम्बां भागातील कार्यवाहीला जाण्यापूर्वीच त्यांना माहिती मिळत असल्याने कार्यवाही करणे अवघड बनल्याचे तलाठी रातोळीकर यांच्याशी संपर्क केला त्यांनी सांगितले.  

कोठा - एकम्बा परिसरातील वाळू तस्कर मोकाटच
----------------------------------
हिमायतनगर तालुक्यातील कोठा - एकम्बा घाटावरून होत असलेल्या रेती चोरीबाबत माहिती घेतली असता तहसील प्रशासन कार्यवाहीसाठी जात असलेली गुप्त माहिती वाळू दादांना मिळत असल्याने या भागातील तस्कर चोरी करण्यात यशस्वी होत आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने या ठिकाणाहून होत असलेल्या रेती चोरीबाबत ठोस पाऊले उचलावेत अशी रास्त अपेक्षा पर्यावरण प्रेमी नागरिक करीत आहेत. 

सोमवार, 2 मार्च 2015

तीन मुली गायबहिमायतनगर(वार्ताहर)श्री परमेश्वर मंदिराच्या महाशिवरात्री यात्रेतून तीन अल्पवईन मुली गायब झाल्या असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मुलींचे अपहरण झाले असल्याचा पालकांनी संशय व्यक्त केली असला तरी पोलिस मात्र अपहरण झाले नसल्याचे सांगत आहेत. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर येथील गणेशवाडी येथे राहणारी कु.सोनुबाई नागोराव सोनेवाड हि १५ वर्षाची अल्पवईन मुलगी व तिच्या मैत्रिणी कु.रेणुका कैलास पवार वय १६ वर्ष, आणि कुसुम कैलास पवार वय ८ वर्ष रा.परमेश्वर गल्ली हिमायतनगर या तिघी जनी दि.२८ फेब्रवारी रोजी दुपारी ३ वाजता यात्रेत झोका खेळण्यासाठी गेल्या होता. तेंव्हा कु.सोनुबाई हिचे वडील नागोराव सोनेवाड यांच्याशी तिची भेट झाली. यात्रेत फिरू नको असे म्हणत वडील नागोराव सोनुबीवर रागावल्याने ती घरी जातो म्हणून निघाली परंतु रात्री उशिरापर्यंत घरी पोंचलीच नाही. त्यांनी नातेवाईकाकडे शोध शोध केली, परंतु दोन दिवस उलटले तरी या तिघी सापडल्या नसल्याने श्री सोनेवाड यांनी हिमायतनगर पोलिस स्थानकात फिर्याद देऊन अज्ञात व्यक्तीने मुलींचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला आहे. 

अपहरणाची शक्यता नाही...पोलिस 
-------------------------- 
बेपत्ता मुलीच्या पालकाने अपहरणाची फिर्याद दिली असली तरी संबंधित मुली रागाने घरून निघून गेल्या असल्याचा अंदाज पोलिस बांधत आहेत. अपहरण झाल्याची शक्यता फेटाळून लावली आहे. एकदाच तीन मुली बेपत्ता होण्याचे प्रकरणी पोलिस मात्र फारसे गांभीर्याने घेताना दिसून येत नसल्याने महिला मुली व लहान मुलांची सुरक्षा रामभरोसे झाल्याचे नागरीकातून बोलले जात आहे.

कुस्तीचा फड

हिमायतनगर(अनिल मादसवार)यात्रेच्या शेवटच्या टप्प्यातील जवळपास 61 हजाराच्या कुस्त्याचा फड तळपत्या उन्हात रंगला. भारतात प्रसीध्द श्री परमेश्वर मंदिराच्या यात्रेतील सर्वात महत्वाचा व शेवटचा कुस्तीची दंगलीच फडास दि.०२ मार्च सोमवारी दुपारी २ वाजता बालमल्लाच्या संत्र्या मोसंबीच्या कुस्तीने सुरुवात झाली. यामद्ये शेवटची अव्वल नंबरच्या मानाची कुस्ती संजय बितनाळ याने जिंकुन सबंध जिल्हाभरात उमरीचे नाव झळकवीले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व कुस्ती शौकीनांनी अभीनंदन करत डोक्यावर घेऊन भव्य मिरवणुक काढली होती.

कुस्तीच्या फाडला लहान मोठ्या बालकांच्या कुस्त्यापासून सुरुवाट झाली. यात 10, 20, 30, 50,100,200 रुपयाच्या कुस्त्या झाल्या. त्यानंतर ५००, १००० च्या कुसात्यानंतर शेवटची मानाची प्रथम क्रमांकाची कुस्ती जीकणा-या पैलवानासाठी 7001 रुपयाचे बक्षीस बजरंग दलाच्या वतीने ठेवन्यात आले होते. ही कुस्ती संजय बितनाळ उमरी व सिकंदर दिल्ली या दोघाच्या तुल्यबळ लढतीत संपन्न झाली. हलगीच्या तालावर सुरु असेलल्या कुस्तीच्या फडात सिकंदरला चित्थ करुन उमरीच्या संजय बितनाळने अव्वल नंबरचा मान मिळऊन कुस्तीचा फड जिंकला. तसेच दुस-या नंबरची 2001 रुपयाची कुस्ती तुल्यबळ लढतीत हरीश शेलगाव याने जिंकली. तसेच तिस-या नंबरची 1501रुपयाची कुस्ती राजु बीतऩाळ याने जिंकली.

त्यानंतर 1001 रुपयाच्या 15 कुस्त्या, तसेच वैयक्तीक कुस्ती शौकीनांनी लावलेल्या 1000 व 500 च्या अश्या मिळुन 61 हजार रुपयाच्या कुस्त्या तळपत्या उन्हात यात्रा कमेटीचे अध्यक्ष श्री लक्ष्मणरावजी शक्करगे, उपाध्यक्ष सुभाष शींदे, सचीव संजय माने, मंदिर समीतीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांच्या उपस्थीतीत पार पडल्या. कुस्तीच्या रंगतदार फड पाहण्यासाठी हदगंाव, हिमायतनगर, किनवट, भोकर, उमरखेड सह अन्य दुर-दुरच्या ठिकाणाहुन हजारों पैलवान व कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती. प्रथम कुस्ती पटकावीणा-या पैलवानास वर उचलुन बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करत बॅेडबाज्याच्या गजरात श्री परमेश्वर मंदिरापर्यंन्त मिरवणुक काढली.

मंदिर संस्थानचे उपाध्यक्ष श्री महावीरचंदजी श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी राजेश्वर चिंतावार, विठलराव वानखेडे, माधव पाळजकर, आनंता देवकते, मुलचंद पींचा, प्रभाकर मुधोळकर, ज्ञानेश्वर शिंदे, बाबुराव होनमने व अन्य मान्यवरांच्या हस्ते विजेत्या पैलवानास बक्षीस प्रदान करण्यात आले. यावेळी हानुसींग ठाकुर, गजानन चायल, मारोती हेंद्रे, खुदुस मौलाना, शेंनेवाड सर, राजु गाजेवार, बाबुराव पालवे, बाबुराव भोयर, मारोती वाघमारे, देवराव वाडेकर, प्रकाश साबलकर, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक अनगुलवार, पापा पार्डीकर यांनी केले. कुस्तीचा फड व यात्रेतील सुरक्षेसाठी पोलीस निरीक्षक अशोक गिरी व पोलीस उपनीरीक्षक सुशील चव्हाण यांनी दंगल नियंत्रन पथकासह 30 पोलीसांचा कडक बंदोबस्त लावला होता.

वाचकांना निवेदन

नांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.
नांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या शा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...
anilmadaswar@gmail.com, nandednewslive@gmail.com