नांदेड(खास प्रतिनिधी) नांदेड - लातूर महामार्गावरील ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्या-लयातील द्वितीय वर्षात शिक्षण घेणा-या एका विद्यार्थ्याच्या स्कुटीला ट्रॅव्हल्सने जबर धडक दिल्यामुळे विद्यार्थी जागीच ठार झाला तर अन्य दोनजण जखमी झाल्याची घटना सोमवारी दि.१६ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली आहे.
भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना वाघलवाडा येथील कृषी अधिकारी प्रकाश पवार यांचा एकुलता एक मुलगा शुभम पवार हा विष्णुपुरी जवळ असलेल्या ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. तो सकाळी खाजगी शिकवणीसाठी नांदेडकडून विष्णुपुरीकडे स्कुटी नंबर एम.एच.२६- ए.एल.९३५० वर बसून मित्रा सोबत जात असतांना लोह्याकडुन भरधाव वेगात येणारी ट्रॅव्हल्स नंबर एम.एच.१४- बी.ए.९९६७ च्या चालकाने जोरदार धडक दिली. या घटनेत शुभम प्रकाश पवार याचा छाती, डोक्याला गंभीर मार लागला. तर स्कुतीवरील अन्य दोन विद्यार्थ्यांना सुद्धा गम्बीर दुखापत झालि. तातडीने या सर्वाना नांदेड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान उपचार सुरु असताना शुभमचा मृत्यू झाला तर अन्य दोघांवर उपचार सुरु आहेत. अपघात घडल्यानंतर काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल होऊन प्रथम वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली. या भागात मागील अनेक महिन्य्पासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी विष्णुपुरी भागात एसजीजीएस, सहयोग, ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालय, स्वारातीम विद्यापीठ या ठिकाणी गतिरोधक बसवावे अशी मागणी विद्यार्थी वर्गातून करण्यात येत आहे.
Post a Comment
please do not enter any spam link in the comment box