सरसम येथील शिवजयंती शिवसैनिक व भीमसैनिक एकत्र
हिमायतनगर(वार्ताहर)मौजे सरसम येथे छत्रपति शिवाजी महाराज यांची ३८६ वि जयंती उत्साहात साजरी करण्यात आली असून, सबंध तालुकाभरातील शिवसैनिक व भीमसैनिक एकत्र एवुन हि जयंती साजरी करण्यात आल्याने यात सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडून आले आहे.
दि.२७ शुक्रवारी सायंकाळी इंदिरा नगर सरसम येथे पार पडलेल्या शिवजयंती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रताप देशमुख सरसमकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भीमटायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर दादा शेळके, सुनील वानखेडे, आदींची उपस्थिती होती. प्रथमतः शिवाजी महारजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर बोलताना शंकर दादा शेळके म्हणाले कि, महापुरुषांना जातीच्या बंधनात बांधण्याचे पाप करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरुद्ध आमचा लढा असून, जातीचा कुपत जाळण्याचे काम आमची संघटना करत असल्याचे सांगितले. तर महापुरुषांची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करण्याचे आवाहन श्री देशमुख यांनी केले. यावेळी अनेक वक्त्यांनी छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारी भाषणे केली.
भीम सैनिकांनी आयोजित केलेल्या शिवजयंती सोहळ्याला शिवप्रेमी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे या जयंतीला शिवसैनिक व भीमसैनिकांचा मेळ एकत्र आल्याने कार्यक्रमाला रंगत आली होती. याच कार्यक्रमात अतुल गायकवाड व संगीता गायकवाड यांच्या संगीत मैफिलीने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष गुंडेकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार राजू वाठोरे यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धम्मा कांबळे, प्रवीण कांबळे आदींसह सर्व भीमसैनिक व शिवसैनिक युवक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.