शिवरायाच्या कालखंडामध्ये शेतकर्याचे आत्महत्या झाल्याचे आढळत नाही- बालाजी गाढे
नांदेड(प्रतिनिधी)नांदेड छत्रपती शिवरायाच्या कालखंडामध्ये आतापेक्षा भयान दुष्काळ पडला होता. परंतु त्या कालखंडामध्ये एकही शेतकर्याने आत्महत्या केल्याचे आढळत नाही त्यामुळे आताचा राज्य सरकारने शिवकालीन शेती विषयक धोरणाचा अवलंब करुन शेतकर्यांच्या आत्महत्या थांबाव्या अशी माहिती प्रसिध्द विचारवंत बालाजी गाढे यांनी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद नांदेड येथे आयोजीत भव्य शेतकरी मार्गदर्शन मेळावा व महाअधिवेशनामध्ये बोलताना व्यक्त केले.
अध्यक्षस्थानी मराठा सेवासंघाचे प्रदेश आध्यक्ष कामाजी पवार प्रमुख पाहुने म्हणून कृषी परिषदेचे प्रदेश आध्यक्ष संजय दळे पाटील,एकनाथ राव पावडे,प्रा.डॉ.गणेश शिंदे,स्वागत आध्यक्ष अंकुशराव मोरे स्वाभीमानीचे जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद इंगोले,बालाजी बोकारे,विठ्ठल पावडे, डॉ. रेखा पाटील,इंजि.शेरा पाटील,स्वाभीमानी संभाजी बिगेडचे प्रदेश आध्यक्ष संतोष गव्हाणे ,माधव देवसरकर,गुणवंत आढरे पाटील,प्रतापसिंह मोहिते पाटील,शामसुंदर शिंदे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना गाढे यांनी छत्रपती शिवाजी महाराजाचे शेती विषयक धोरण कसे होते हे उपस्थित शेतकर्यांना पटवून सांगितले शिव कालीन पाणी योजना,शिव कालीन शेती विषयक छत्रपती शिवरायानी शेतकर्यांचा मिरचीचा देटालाही हात लावु नका असे सक्त ताकीद आपल्या सेन्याना दिली होती त्यामुळे त्याकाळात शेतकर्यांचे मनोबल शेती करतांना उंचावत होती शिवरायाचा काळामध्ये शेतकर्यांना सनमानाची वागणूक दिली जात होती अशी माहिती दिली उपस्थित शेतकर्यांना गाढे यांनी दिली