बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत

पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या...
बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत 


नांदेड(अनिल मादसवार) शहरासह जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात पेरण्यांची तयारी पूर्ण झाली तरी अद्याप मृग नक्षत्रातील पाऊस झाला नाही. पावसाने डोळे वटारल्यामुळे शेतीकामे आटोपुनही नांदेड जिल्ह्यासह १६ तालुक्यातील खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तर पाणी असलेल्या काही शेतकर्यांनी पेरण्या केल्या मात्र, पिकला पाणी देता - देता वाढत्या उष्णतेमुळे शेतकऱ्यांच्या नाके नऊ येत आहेत. जर मृगाच्या पावसाला उशीर झाला तर, येणाऱ्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. वेळेवर पाऊस पडेल या आशेने ५० टक्के शेतकर्यांनी  खते - बियाणे साठून ठेवले तर गोर - गरीब शेतकी मात्र मोठ्या पावसाला सुरुवात झाल्या नंतरचा  बियाणे खरेदी करणार आहेत. त्यामुळे एकदाचा बियाणांच्या दुकानात शेतकऱ्यांची गर्दी होणार असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लुट होण्याची शक्यता बळावली आहे. 

तीन महिन्यांपूर्वी गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. या आर्थिक संकटानंतर शेतकऱ्यांच्या आशा खरीपावर आहेत. मान्सून वेळेवर दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी केली आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यातील पाणी असलेल्या शेतकर्यांनी धुळ पेरणी केली आहे. काहीजण पिके जागविण्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणी देत आहेत. सन २०१३ मध्ये नांदेड जिल्ह्यात वार्षिक सरासरी पर्जन्यमान 983 मिलीमिटर झाले असून, गेल्यावर्षी जिल्ह्यात १६ तालुके मिळून एकूण १५ हजार ७३५.३८ मी.मी. (१०२.९२ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. मागीलवर्षी जूनअखेर १५३ मि.मी. पाऊसाची नोंद झाली होती.

यावर्षी खरीप हंगामाची सुरुवात होऊन ४ दिवस लोटले मात्र अद्याप पाऊस बेपत्ता आहे. खरीपाच्या पेरण्यांसाठी शेतकरी सज्ज झाले असून, आता फक्त पावसाची प्रतीक्षा आहे. असे शेतकी वर्गातून सांगितले जात आहे. यावर्षीचा खरीप चांगला असेल या आशेने शेतकऱ्यांनी मशागतीची कामे  आटोपून कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर, उडीद मुग आदी पिकांची लागवड करण्याची तयारी केली आहे. मात्र अजूनही एकही पाऊस झाला नसल्याने पेरण्यासाठी शेतकर्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

मागील काही वर्षात निसर्गाचा समतोल बिघडला आहे. मृग नक्षत्रातील पहिल्या आठवड्यात पाऊस पडणे ही बाब दुर्मिळ झाली आहे. शेतीची मशागत पूर्ण झाल्यानंतर अवकाळी किंवा पहिल्या पावसानंतर खरीपाच्या क्षेत्रात एदचि वखर पाळी करून शेतकरी तणकट वेचून पेरणीला सुरुवात करतात, परंतु बहुतांश तालुक्यात अजूनही मृग नक्षत्रात एकही पाऊस झाला नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.  

सतत दोन वर्षे दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यानंतर गारपिटीमुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीवर भर दिला आहे. मागच्‍यावर्षी सात लाख 76 हजार हेक्‍टर क्षेत्रात खरीपाची पेरणी करण्‍यात आली होती. यात कापूस 2 लाख 77 हजार हेक्‍टर, सोयाबिन 2 लाख 75 हजार हेक्‍टर, तृणधान्‍य 90 हजार, कडधान्‍य 1 लाख 16 हजार तर 15 हजार हेक्‍टर क्षेत्रात ऊसाची लागवड करण्‍यात आली होती. चालू वर्षातील हंगामात सोयाबिन पेरणीच्‍या क्षेत्रात 25 हजार हेक्‍टरने वाढ होण्‍याची अपेक्षा आहे. जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पाऊस वाढणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी पूर्वमशागतीची कामे आटोपली आहेत.खरीपाची पेरणी करतांना शेतक-यांनी जमीनीत पुरेशी ओल झाल्‍यानंतर पेरणी केल्यास फायदेशीर ठरेल असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

सन २०१३ च्या ०२ अक्टोबर पर्यंत झालेल्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे आहे.
नांदेड - ११४४.३८ मी.मी.   - १२५.४९ टक्के 
मुदखेड - ९८५.९८ मी.मी.  - ११५.५१ टक्के 
अर्धापूर - ९९८.९५ मी.मी.  - ११४.८७ टक्के 
भोकर   - ११२०.५८ मी.मी. - ११२.४६ टक्के 
उमरी    - ९९५.०८ मी.मी.  - ९९.८७ टक्के
कंधार   - ७७०.६२ मी.मी.  - ९५.५४ टक्के
लोहा    - ८१०.४८ मी.मी.    - ९७.२६ टक्के
किनवट - १२२७.३२ मी.मी. - ९८.९८ टक्के
माहूर    - १४६६.७० मी.मी.  - ११८.२८ टक्के
हदगाव  - १०८८.२६ मी.मी.  - १११.३५ टक्के 
हि.नगर - १२०२.९३मि.मी.   - १२३.०९ टक्के
देगलूर   - ६९१.५१ मी.मी.    - ७६.८१ टक्के
बिलोली  - ८२०.०७ मी.मी.  - ८४.७१ टक्के 
धर्माबाद - ८१३.९९ मी.मी.   - ८८.९० टक्के
नायगाव - ६८२.०० मी.मी.  - ७४.४९ टक्के
मुखेड     - ९१६.५३ मी.मी.  - १०३.३५ टक्के
एकूण   - १५७३५.३८ मी.मी.  - १०२.९२ टक्के 
सरासरी - ९८३.४६ मी.मी.  - १०२.९२ टक्के पावसाची नोंद अक्टोबर २०१३ पर्यंत झाली आहे. अशी माहिती जी.प.नांदेड च्या संकेत स्थळावर उपलोड करण्यात आली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी