तणाव निवळला

उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने वटफळी गावातील तणाव निवळला 


हिमायतनगर(वार्ताहर)हदगाव- हिमायतनगर रस्त्यावर असलेल्या मौजे वटफळी येथे पंचशील ध्वज लावण्यावरून दोन समजात तणाव निर्माण झाला होता. मात्र उपविभागीय अधिकारी दीपक घाडगे व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्तीमुळे अखेर तिसऱ्या दिवशी सामंजस्याने तणाव निवळल्याने शांतता प्रस्थापित करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर असे कि, तालुक्यातील मौजे वटफळी येथील बौद्ध बांधवांनी स्वतःची शेती समजून व शेतातून गेलेला रस्ता आपल्या हद्दीत असल्याच्या गैर समजुतीने सदरची जागा आपल्या मालकी हक्कात येते, या भावनेतून मागील तीन दिवसापूर्वी वटफळी ते पोटा बु. या रस्त्यावर पंचशील ध्वज लावला होता. परंतु गावातील काही लोकांनी यावराक्षेप घेत वाद निर्माण केला होता. सदरील झेंड्याच्या जागेवरून गावात तणाव वाढल्याने प्रशासनास सदरील प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. पंचशील ध्वज लावल्याची जागा वास्तविक पाहता बौद्ध बांधवाचे मालकी हकाक्चे व ताब्यातील असल्याने वाद निर्माण होणार नाही या अपेक्षेने ध्वज लावला होता. दि.०९ जून २०१४ रोजी उपविभागीय अधिकारी हदगाव, उपविभागीय पोलिस अधिकारी भोकर, तहसीलदार हिमायतनगर, गटविकास अधिकारी हिमायतनगर, विस्तार अधिकारी हिमायतनगर व तामसा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. आणि भूमी अभिलेख खात्याच्या अधिकारी व कर्मचार्यांन पाचारण करून जागेची मोजणी केली असता सदरील जमीन हि विजय सयाजी काळबांडे यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. परंतु सदरील जागेमधून जी.प.बांधकाम विभागाने कोणत्या धातीवर रस्ता निर्माण केला हे न समजल्यामुळे सदरील शेतमालकाने ध्वजारोहण केले होते. एक तर रस्ता निर्माण करताना जी.प.बांधकाम विभागाच्या अधिकार्याने सदर शेतकर्यास विश्वासात घेतले नसावे. किंवा त्यांना तशी गरज वाटली नसावी..? असे दिसून येते. 

पंचशील ध्वज हा रस्त्यात आला असल्याने तो रस्ता परस्पर केला असावा, रस्त्याच्या दुतर्फा बौद्ध शेतकरी काळबांडे यांची जागा निघाल्याने रस्त्याच्या कडेला पंचशील ध्वज उभारण्यासाठी परवानगी देण्याचे उपविभागीय अधिकारी श्री घोडगे यांच्या आश्वासनाने बौद्ध बांधवांनी शांततेची भूमिका घेतल्याने गावात तणावपूर्ण शांतता आहे. या प्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी  दत्तात्रेय कांबळे, हिमायतनगर तहसीलदार अरुण जराड, प्रभारी गटविकास अधिकारी गोरे, पंचायत समिती विस्तार अधिकारी रविराज क्षीरसागर, कक्षा अधिकारी शिवारात्रे, उपकार्यकारी अभियंता मुंडे, शाखा अभियंता पाटील, मुधोळकर, भूमिअभिलेख खात्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी, सामाजिक कायकर्ते गंगाधर वाघमारे यांच्यासह नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी