हिमायतनगर - किनवट तालुका अंधारात

१३२ के.व्ही चा केबल तुटल्याने हिमायतनगर - किनवट तालुका अंधारात


हिमायतनगर(वार्ताहर)विदर्भातील उमरखेड येथून येणाऱ्या विद्दुत पोलचा केबल तुटल्याने बुधवारी अख्या  हिमायतनगर - किनवट तालुक्यातील वीज ग्राहकांना रात्र अंधारात काढावी लागली आहे. दरम्यान विदूत पुरवठ्यावरून सवना जा आणि महावितरणच्या अधिकार्यात तू तू - मै मै झाल्याने काही काल तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिस व पत्रकारांच्या मध्यस्तीने तणाव निवळला असला तरी महावितरण कंपनीच्या ढेपाळलेल्या कारभारावर विग ग्राहक जाम चिडल्याचे दिसून आले आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, बुधवार दि.१२ रोजी सायंकाळी ०६ वाजता वादळी वारे व विजांच्या कडकडाटाने पावसाचे आगमन झाले. या सुसाट वेगातील वार्यामुळे उमखेड येथून हिमायतनगर - किनवट तालुक्याला विद्दुत पुरवठा करणारी १३२ के.व्ही.लाईनचा केबल तुटून पडला आहे. यामुळे कोणतीही वित्त अथवा जीवित हानी झाली नसली तरी मात्र अख्या हिमायतनगर - किनवट तालुक्यातील नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली आहे. या प्रकारामुळे ग्रामीण भागातील अनेकांना विचू,किडे, साप सरपटनारे प्राणी याची भीती बाळगत रात्र जागून काढावी लागली आहे.

दरम्यान मागील अनेक दिवसापासून सतत या - ना - त्या कारनावरून सवना, खडकी बा.सह अन्य विद्दुत फिडरवरच्या विद्दुत पुरवठा खंडित होत असल्यामुळे संतप्त झालेल्या सवना ज. वाशियानी हिमायतनगर येथील ३३ के.व्ही.केंद्रात कार्यरत असलेले ऑपरेटर आर.बी.काकडे यांना विद्दुत पुरवठा वारंवार खंडित होण्याचे कारण विचारले असता. त्यांनी विद्दुत ग्राहकांशी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप करीत शेकडो युवक महावितरण कंपनीच्या कार्यालयावर दाखल झाले. यामुळे भयभीत झालेल्या महावितरण कंपनीच्या अधिकार्यांनी पोलिसांना पाचारण केले. यावेळी महावितरण अधिकारी व ग्राहकात झालेल्या बाचाबाचीत तणाव वाढण्याचे चिन्हे दिसताच सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील चव्हाण, आणि काही पत्रकारांच्या मदतीने दोघांना शांततेचे आवाहन करीत शांत केले. तरी सवना जा येथील नागरिकांच्या रोशावरून मात्र महावितरण कंपनीच्या मनमानी कारभाराला जाम कंटाळ्याचे दिसून आले आहे. 

याबाबत ऑपरेटर काकडे यांच्याशी संपक साधला असता ते म्हणाले कि, आज झालेल्या वादळी वार्यामुळे अगोदर शहरातील विद्दुत पुरवठा खंडित झाला. त्यानंतर १३२ के.व्ही.चे केबल तुटल्याचे    समजले. दरम्यान विचारण्यासाठी येणारी फोन कोल घेऊन सर्वाना सांगणे हे करत असताना सवना ज.येथील एका युवकांनी फोन केला तर त्याच्या पाठीमागील काहींनी उलट शिवीगाळ करून दबाव टाकला. अश्या कठीण परिस्थितीत विद्दुत पुरवठा सुरु करणे आमच्यासाठी महत्वाचे असून, भोक मार्गे विद्दुत पुरवठा घेऊन वीज चालू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी