अर्धापुर, नीळकंठ मदने| बेकायदेशीर जात समिती गठीत करून महाराष्ट्रातील आदिवासी कोळी महादेव समाजाला आपल्या संविधानिक अधिकारापासून दूर ठेवण्याचे षडयंत्र शासनाकडून ठेवले जात आहे,असे प्रतिपादन सिने अभिनेते तथा कोळी समाजाचे नेते शरदचंद्र जाधव यांनी केले. तालुक्यातील निमगाव येथे २७ नोव्हेंबर रोजी आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे,वीरांगना झलकारी, क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या संयुक्त जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी शरदचंद्र जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
येथील आदिवासी कोळी महादेव समाज बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे,वीरांगना झलकारी, क्रांतीवीर बिरसा मुंडा,यांच्या प्रतिमेची मिरवणूक गावातील महादेव मंदिरापासून पारंपरिक आदिवासी पेहरावात काढण्यात आली, काढण्यात आलेल्या आदिवासींच्या पोशाखातील आदिवासी नृत्य सर्वांचे आकर्षण ठरले. मिरवणुकीचे रूपांतर सभेत झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष यादवरावजी तुडमे होते .तर प्रमुख पाहुणे म्हणून समाज नेते तथा सिने अभिनेते शरदचंद्र जाधव, अँड. परमेश्वर गोणारे, अनिता मुदिराज, क्षिरसागर, चांगुनराव बोइनवाड, गंगाधरराव कल्याणकर, यशवंत गादगे, गणेशराव सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाच्या सुरुवातीस महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तद्नंतर उपस्थित मान्यवरांचे जयंती सोहळा समितीच्या वतीने पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी परमेश्वर गोणारे बोलताना म्हणाले की, महामानवांच्या जयंतीच्या निमित्ताने निमगाव येथील समाज बांधवांनी समाज एक केला त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील सर्व समाज एक करून शासन व प्रशासनाकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध यापुढे लढा देणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीधारी मोळके यांनी केले, तर सूत्रसंचालन गोविंद सुर्यवंशी व दिगंबर मोळके यांनी,आभार पत्रकार अनिल मोळके यांनी व्यक्त केले. यावेळी अँड. परमेश्वर गोणारे,अनिता मुदिराज, क्षिरसागर आदींनी मार्गदर्शन केले, तर अध्यक्षीय समारोप माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे यांनी केला.
यावेळी संजय घोरपडे, बालाजी पन्नासे, बालाजी सोगे,केशव जिंकलवाड,बाळू पुंजरवाड,माधवराव बोइनवाड, माधवराव नारेवाड, माजी सरपंच संजय मोळके, पोलीस पाटील कान्होजी मोळके, वसंतराव चव्हाण, अंकुश मोळके, गोरखनाथ सोळंके, गणपत सोळंके, गजानन जगताप, तंटामुक्ती अध्यक्ष गंगाराम झुडपे, दगडूजी जगताप, माजी उपसरपंच बालाजी जगताप, राजाराम जगताप, सतीश जगताप, जे टी मोळके, गोपीनाथ वडजे, नालाजी मोळके, मारुती जगताप, मारुती मोळके, मुकेश मोळके, बजरंग मोळके, प्रभू मोळके , राहुल मोळके, रवी मोळके, राजू मोळके, विष्णू मोळके, शिवाजी सोळंके, पांडुरंग सोळंके, मुकेश सोळंके, पिराजी भिसे, गजानन सूर्यवंशी, चंद्रदीप सूर्यवंशी, रवी तेली, राजू सोगे, रंजी त जगताप, उमेश घोरपडे, सुनील जगताप, मानेजी डोंगरे, कोंडीबा घोरपडे, नितीन वाघमारे, पांडुरंग झुडपे, गोपाल सूर्यवंशी, मुंजाजी मोळके, आदी आदीसहित जिल्ह्यातील व मराठवाडा,विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र, येथून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.