कृषी विभागाच्या वतीने हरभरा पिकांतील मर रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी माहिती दिली -NNL



हिमायतनगर, कल्याण पाटील।
  तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना कृषी विभागा पर्यंत येता येत नाही त्यासाठी कृषी विभागाच्या वतीने माहिती देण्यात आली हरभऱ्यावरील मर रोगामुळे शेतकरी अडचणीत आले असून सर्वाधिक क्षेत्रावर असलेले हे पीक सध्या  काही भागात धोक्‍यात आले आहे. 

गेल्या दोन वर्षांत बाजारभावातील तेजी, गेल्या वर्षी तूर विक्रीतील अडचण, खरीप हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात झालेला पाऊस यामुळे यावर्षी पाऊस समाधान कारक झाल्यामुळे हरभरा पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला, मात्र खरीप हंगामात जमिनीत असलेला ओलावा, तणनाशकांची फवारणी व काही दिवसांपूर्वी झालेला जोरदार पाऊस यामुळे हरभऱ्यावर मर रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे. तालुक्‍यात यावर्षी खरीप हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र सर्वाधिक आहे; मात्र मर रोगाच्या प्रादुर्भावामुळे पीकक्षेत्र अडचणीत आले आहे. तुरीचे  जास्त पाऊसामुळे उधळली आहेत त्यामुळे तुर उत्पादन  घटलेले  सोयाबीन भावातील घसरण व भाव अनिश्‍चितता यामुळे हरभरा पिकाकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहेत; मात्र पेरणीनंतर काही दिवसांतच रोगाची लक्षणे दिसू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.. 




सततची द्विदल पिकांची पेरणी, तणनाशकांचा अनियंत्रित वापर, शेतीची मशागत करण्यात होत असलेला बदल, पेरणीनंतर जमिनीत असलेला ओलावा किंवा चुकीच्या पद्धतीने पाणी व्यवस्थापन करणे अथवा जास्त ओलाव्यावर झालेली पेरणी यामुळे मर रोगांची लक्षणे दिसू शकतात. त्यासाठी तीन पीकपद्धतीऐवजी दोन पीकपद्धती राबविणे गरजेचे आहे.  जमिनीत काडी कचरा आणि न कुजलेले शेणखत यामुळे जमिनीत बुरशी वाढत चालली आहे..  यामुळे हरभरा पिकांची मर फार मोठ्या प्रमाणात होत आहे 

 जमिनीला उन्हाळ्याच्या काळात पुरेशी विश्रांती मिळाली पाहिजे. हरभऱ्यावरील मर रोग रोखण्यासाठी आंतरप्रवाही बुरशी नाशकांचा वापर करणे गरजेचे आहे उदा रोको,एलीएट, कार्बेन्डाझिम  यांपैकी एक बुरशीनाशकांची फवारणी करावी किंवा ट्रायकोडार्मा व राझोमिका दाट फवारणी करावी शिवाय जमिनीची मशागत जसे की तुषार सिंचन ने पाणी देवून दोन कोळपणी करावी  व खुरपण केल्यास काही प्रमाणात मर रोगावर नियंत्रण मिळू शकते. अशी माहिती तालुक्यातील शेतकरी बांधवांना कृषी विभागाच्या वतीने कृषी अधिकारी दिलीप जाधव, कृषी विभाग हिमायतनगर यांनी दिली आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी