नायगांव, रामप्रसाद चन्नावार। ज्ञानसुर्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शालेय परिपाठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतांना या प्रसंगी प्राचार्या सौ. सरोज धरणे संस्थेचे सचिव श्री. कुमुदकांत पटेल उपस्थित होते.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन संघर्ष आणि यांच्या दैदिप्यमान कार्य प्रवास या बाबत आपले मत शाळेच्या सहशक्षिका सौ. गंगा कोरे मॅडम यांनी व्यक्त केले. तर शाळेचे इंग्रजी विषय विभाग प्रमुख श्री. नवनाथ वरवटे सरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक आणि भारतीय घटना समितीतील योगदान या विषयी आपले मत व्यक्त केले. या प्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी. विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.