गाडीत पाणी आणि स्वछतेचा अभाव !
नांदेड। श्री हजुरसाहिब नांदेड आणि अमृतसर दरम्यान धावणाऱ्या सचखंड एक्सप्रेस गाडीच्या भाविक व प्रवाश्यांना सुविधांचा अभाव आणि अस्वछतेशी सामना करावा लागत आहे. अनेकवेळा तक्रार केल्यानंतर देखील समस्या जैसे थे आहे. वरील विषयी आज स्वतः पंजाबहुन आलेल्या प्रवाश्यांनी नांदेड विभागीय रेलवे कार्यालय सांगवी गाठून आपला रोष प्रकट केला. गुरुद्वारा बोर्डाने वरील विषयी निवेदन सादर केले आहे.
वरील विषयी सविस्तर माहिती अशी की मागील दोन ते तीन महिन्यापासून सचखंड एक्सप्रेस रेलवे गाडीत डब्ब्यामध्ये व्यवस्थितपणे पाणी भरले जात नाही आहे. तसेच शौचालयातील घाणीची स्वछता केली जात नाही आहे. काल (दि. 7 डिसेम्बर) रोजी अमृतसर येथून निघालेल्या सचखंड एक्सप्रेसच्या अनेक बोगी मधील शौचालयातील पाणी संपले होते. किंवा भरले गेलेच नसावे. गाडीत असंख्य वृद्ध व महिला सुद्धा होते. रेलवे सेवेतील दुर्दशा पाहून दिल्ली स्टेशनवर प्रवाश्यांनी आपला रोष प्रकट केला. दिल्ली स्टेशनवर सांगण्यात आले की गाडी साउथ सेंटर विभागाची असल्याने त्याच्या मेंटेनेंस विषयी आमची जवाबदारी नाही. प्रवाश्यांनी आज नांदेड पोहचून वरील प्रकरण गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे अधीक्षक स. शरणसिंघ सोढी यांच्या कानावर घातला. तसेच गुरुद्वारा श्री लंगरसाहेबचे बाबाजी संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले यांना वरील विषयी माहिती दिली.
त्यानुसार दि. 9 डिसेम्बर रोजी दुपारी 3.30 वाजता सुमारे गुरुद्वारा श्री लंगर साहेबचे बाबा सूबेगसिंघ कारसेवा वाले, सामाजिक कार्यकर्ता स. अवतारसिंघ पहरेदार, पत्रकार स. रविंदरसिंघ मोदी, गुरुद्वाराचे कर्मचारी स. विक्रमजीतसिंघ कलमवाले, भाविक स. तरसेमसिंघ पंजाब, गुरमीतसिंघ पंजाब, इंदरजीतसिंघ पंजाब आणि इतर लोकांचा समावेश होता. वरील निवेदन रेलवे अधिकारी श्री डोईफोडे आणि ए. डी. आर.एम. चे निजी सहायक शैलेश यांना सौपविण्यात आले. रेलवे जनरल मैनेजर सिकंदराबाद यांचा दौरा सुरु असल्यामुळे नांदेड विभागीय कार्यालयात अधिकारी तिकडे व्यस्त होते. पण शनिवारी सकाळी 11 वाजता दरम्यान शीख समाजाच्या शिष्टमंडळाशी बोलण्याची तयारी अधिकाऱ्यांनी दाखविली आहे. सचखंड एक्सप्रेस विषयी सुधारणा केली गेली नाही तर शीख समाजाला आन्दोलनाचा पावित्रा घ्यावा लागेल असा इशारा देखील देण्यात आला.