लोहा| जुन्या लोह्यातील लक्ष्मीकांत चंद्रकांत कहाळेकर हा विद्यार्थी आर्थिक बिकट परिस्थितीमुळे एमबीबीएस साठी पात्र झाला पण आर्थिक परिस्थिती तो जाऊ शकत नव्हता या बाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या नंतर अनेकजण मदतीसाठी पुढे आले. शिवणकाम करणाऱ्या आईचे स्वप्न साकार झाले .जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर याच्या मार्गदर्शना खाली युवा नेते प्रवीण पाटील व प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी लक्ष्मीकांत यांच्या वसतिगृह फिस उर्वरित काळात उचलण्याचे आश्वासित केले आणि प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी घरी जाऊन त्यास नगरी ७५हजार रुपयांची मदत दिली .यावेळी माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार, उपनगराध्यक्ष दत्तराव वाले उपस्थित होते.
जुन्या लोह्यातील लक्ष्मीकांत काहलेकर या गरीब विद्यार्थ्यांचा एमबीबीएस प्रवेश पैशा अभावी हुकणार होता. दै प्रजावाणी मध्ये रविवारी वृत्त प्रसिद्ध आणि सेवानिवृत्त अधिकारी रामदास पाटील यांच्या पुढाकाराने ४लक्ष३०हजार रुपयांची मदत झाली तसेच अनेक दानशूर पुढे आले आणि लक्ष्मीकांत यांचा एमबीबीएस प्रवेश निश्चीत झाला.त्याच वेळी जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा मार्गदर्शनाखाली युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर व प्राणिताताई यांनी लक्ष्मीकांत याना सहकार्य करण्याचे आश्वसित केले. भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिताताई देवरे चिखलीकर यांचा हस्ते लक्ष्मीकांत कहाळेकर यांना 75 हजार रुपये रोख स्वरूपात देण्यात आले.तसेच आई व मुलगा यांचा सत्कार करण्यात आला .तुझ्या सोबत आम्ही आहोत पैशा अभावी तुझ्या शिक्षणात खंड पडणार नाही.
तसेंच खा प्रतापराव पाटील चिखलीकर व जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांचा पुढाकाराने डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालचे अध्यक्ष डॉ उल्हास पाटील यांचाशी चर्चा करून लक्ष्मीकांत कहाळेकर याचा पुढील उर्वरित वर्षाचा वसतिगृह चा खर्च उचलण्याचे प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी आश्वासन दिले.आणि त्यांना रोख ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली.यावेळी माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार , उपनगराध्यक्ष दता वाले, नगरसेवक भास्कर पाटील, हरिहर धुतमल, काशिनाथ शिरसिकर, युवा कार्यकर्ते दीपक पाटील कानवटे, सचिन मुकदम, बाळू कदम, प्रवीण धुतमल, बाळू पवार, भगवान चव्हाण, विमलबाई चव्हाण, कैलास कहाळेकर, शिवा मुंडे यासह कार्यकर्ते उपस्थित होते.