श्रीक्षेत्र माहूरगड, राज ठाकूर। आनवाणी हातात निशान अनू मुखाने दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या ,हो "देवा दत्ता दत्ता,देवा दत्ता दत्ता" असा गजर माहूर गडावर सुरू आहे सभोवतालच्या जिल्हयासह राज्यातून लाखोच्या संख्येने भाविकांचे पालख्यासह आगमन होत आहे
गडावरील विविध मठांनवर विघुत रोषनाई,रंग रागोटि व सजावट करण्यात आली आहे संभोताल जंगलात असलेल्या दत्त शिखर मंदिर, चक्रधर स्वामी व एकमुखी दत्तात्रेय ( देवदेवेश्वर) मंदिर, साईनाथ महाराज (वसवतकर), श्याम भारती महाराज (केरोळि फाटा)वडगुंफा मठ,दत्ता महाराज वनदेव,सर्वतिर्थ,बळिराम महाराज मठ,लिने महाराज,चंचल भारती, या सह तात्पुरत्या राहुट्या अदि ठिकाणी दत्तनाम स्मरणाचे तथा उद्दघोषणाने सारा असमंत दुमदुमून निघत आहे
माहूर गडावर नवरात्र, परिक्रमा यात्रा नारळी पोर्णिमा , दंत्त जयंती ह्या यात्रेत मोठ्या प्रमानात भाविक दाखल होतात दंत्त जयंती निमित्त ग्रामिण भागातील भाविक आपल्या परिवारासह दर्शना साठि गडावर दाखल होतात. दि,२ते १० डिसेंबर पर्यत चालणार्या यात्रे दरम्यान अनेक भाविक दर्शना करीता येतात मार्गशीर्ष मास दत्त जयंती उत्सव कार्यक्रमास शुक्रवार दि,२ पासून सुरवात झाली आहे.
दंत्त शिखर येथे दि,३ शनिवार एकादशी ला दुसरी पालखी रविवार द्वादशी तिसरी, सोमवार त्रेयोदशी चौथी पालखी व बुधवार चर्तुदशी सहावी पालखी व दुपारी १२ वा, (मा,काळ) दंत्त जन्म होणार आहे गुरुवारला पोर्णिमा भंडारा, शुक्रवार,दहिहंडी प्रतिपदा, शनिवारी देवाचा काकडा व समाप्ती होणार असल्याची माहिती कार्यालयीन अधिक्षक अॅड, उज्वल भोपि यांनी दिली, या यात्रे दरम्यान कोणताहि अनुचित प्रकार घडु नये म्हणुन तहसिलदार किशोर यादव , पोनि नामदेव रीठ्ठे,सपोनी,अन्नासाहेब पवार,श्रीधर जगताप, संजय पवार मुख्याधिकारी राजकुमार राठोड, नप कार्यालयीन अधिक्षक वैजनाथ स्वामी ता,अरोग्य अधिकारी डॉ,अशिष पवार ,ग्रामिण रुग्णालय वैधकिय अधिकारी व्हि,एन,भोसले आगार प्रमुख रामटेके ,विज वितरण अभियंता कोटे हे लक्ष देत आहेत.