दरेगाव येथील ग्रामसेवक सूर्यवंशी यांना मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा-NNL

जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना ग्रामसेवक युनियननं दिलंय मागणीच निवेदन 


नांदेड, अनिल मादसवार|
हिमायतनगर तालुक्यातील मौजे दरेगाव ग्रामपंचायत निवडणुक नामांकन भरण्यासाठी आवश्यक असलेले बेबाकी प्रमाणपत्र देण्यास संबंधित ग्रामसेवकांकडून चालढकल केली जात होती. त्यामुळे संतापलेल्या इच्छुक उमेदावर व त्याच्या साथीदाराने ग्रामसेवक के.डी.सूर्यवंशी याना भर चौकात शिवीगाळ करत मारहाण करून कायदा हातात घेतला आहे. त्या दोघांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि कठोरातील कठोर शिक्षा करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य नांदेड जिल्हा ग्रामसेवक युनियनने केली आहे. यामुळे ग्रामसेवकास मारहाण करणे इच्छुक उमेदवारास व त्याला साथ देणाऱ्यास चांगलेच महागात पडले असल्याचे यावरून दिसून येत आहे.


नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या मौजे दरेगाव ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. निवडणुकीसाठी नामांकन भरताना देण्यासाठी बेबाकी प्रमाणपत्रची आवश्यकता होती. निवडणुकीचे काम करताना हे प्रमाणपत्र देण्यास विलंब झाला. तरीदेखील ग्रामसेवक के.डी.सूर्यवंशी हे बेबाकी प्रमाणपत्र सोबत घेऊन संबंधितांना देण्यासाठी गेले होते. मात्र त्यांचे एकही न ऐकता दरेगाव येथील  ल्यामुळे येथील ग्रामसेवक केरबा सूर्यवंशी यांना इच्छूक उमेदवार संतोष बन्सीलाल राठोड व मोहन प्रेमसिंग राठोड यां दोघाजणांनी हिमायतनगर शहरातील मुख्य कमानी जवळ भर चौकात असलेल्या एका हॉटेलसमोर मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला होता. 


तसेच आर्वाच्छ भाषेत शिविगाळ करुन काॅलर धरली व झटापट करुन नागरिक समक्ष दिवसाढवळ्या बुटाने मारहाण केली....आणि ग्रामसेवकाजवळ असलेल्या शासकीय कामाच्या कागद पत्राची नासधुस करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. यावरून मारहाण करणाऱ्याच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणि ऐट्रोसिटी कायद्यानुसार भादवि कलम ३५३,३३२,३२३,५०४,५०६,३४, अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती कायदा अधिनियम १९८९ अंतर्गत ३ (१) (r), ३(१) (s) अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दखल झालायचे समाजातच दोघेही फरार झाले असून, अजूनही त्यांना अटक झाली नसल्याने ग्रामसेवक संघटना आक्रमक झाली आहे. जिल्हा ग्रामसेवक संघटनेने नांदेड येथे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देऊन मारहाण करणाऱ्या दोघांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे. या निवेदनावर अध्यक्ष धनंजय वडजे, कोषाध्यक्ष श्रीनिवास सुगावे, मानद अध्यक्ष गोविंद माचणवाड, कोषाध्यक्ष धम्मानंद कात्रे, सचिव हणमंत वाडेकर आदींसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

या संदर्भात हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी डी भुसनूर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, घटलेली घटना अयोग्य आहे. त्यांनी कायदा हातात घेतला यामुळे ग्रामसेवकांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीच्या शोधासाठी आमही गावात जाऊन आलो. मात्र ते मिळवून आले नाहीत त्यांच्या शोधात उपविभागीय पोलीस अधीक्षक शफाकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली आमची टीम सक्रिय झाली असल्याचे त्यांनी सांगितले.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी