उस्माननगर, माणिक भिसे। नांदेड ते बिदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वरील मौजे किवळा ता.लोहा येथे अज्ञात वहानाच्या धडकेत ५ वर्षीय नरजातीचे काळवीट जागीच ठार झाले.
दि.७ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास सदरील घटना घडली किवळा शिवारातील पेट्रोल पंपाजवळ रस्ता वोलांडून जंगलाकडे जात असना-या ल एका काळवीटास भरधाव वेगाने जाना-या वहानाने जबर धडक दिली.किवळा येथील सामाजिक कार्यकर्ता चक्रधर किवळेकर हे नेहमी प्रमाणे मॉर्निग वॉक साठी गेले असता त्याच्या निदर्शनास सदरील घटना निदर्शनास दिसून आली तात्काळ ही माहिती वन विभागास दिली .उस्माननगर बिटचे वनरक्षक विजय मुंडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मयत काळवीटास ॲटो या वाहनातून पशुवैद्यकीय दवाखाना कलंबर बुद्रुक येथे उत्तरीय तपासणीसाठी नेले व उत्तरीय तपासणी केल्यानंतर उस्माननगर बिट जंगलात काळवीटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नांदेड ते बिदर राष्ट्रीय महामार्गावर ५० या रोडवर मागील अनेक दिवसांपासून मृत्युचे माहेरघर बनले आहे .या महामार्गावर भरधाव वेगात हायवा ,टिपर व जडवहाने धावत आहेत या वहानावर संबंधित अधिकाऱ्यांचे व कोणाचेही नियंत्रण दिसून येत नाही.त्यामुळे परिसरातील नागरिकांनी शोकांतिका व्यक्त केली आहे.