हिमाचल प्रदेशात यश नांदेडात काँग्रेसचा जल्लोष -NNL


नांदेड।
हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीत  काँग्रेसने भाजपाचा पराभव करून विजयाची पताका फडकवली याचा  काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर यांच्या नेञत्वात शुक्रवारी शहरातील महात्मा फुले पुतळा परिसरात फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केल़ा यात काँग्रेसचे पदाधिकारी व कायकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होत़े.

देशात द्व्‌ोषाचे राजकारण, ढासळती अर्थव्यवस्था, महागाई व बेरोजगारी तर याच्या विरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेस मिळणार प्रतिसाद निवडणुकांत दिसून येईलकी  नाही याबाबत तर्क वितर्क सुरु असतांनाच याचे इफेक्ट हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीत दिसून आले या राज्यात काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली तर राजस्थान व छत्तिसगड विधानसभा पोट निवडणुकीतही काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत यातून देशात आता परिवर्तन सुरु झाल्याचा सूचक संदेश मिळाला आहे. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर यांच्या नेञत्वात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ढोलताशांच्या गजरात तसेच फटाक्यांची आतषबाजी करून कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केल़ा यावेळी काँग्रेस पक्षाचा विजयी असो, राहूल गांधी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है,काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी,काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी सह काँग्रेस नेञत्वावर मतदारांनी  विश्‍वास व्यक्त केला अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
  
यावेळी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर ,कॉग्रेसच्या वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्षा ड़ॉ मिनल पाटील खतगावकर,माजी महापौर बलवंतसिंग गाडीवाले,आनंद चव्हाण, दिलीप पाटील बेटमोगरेकर,संजय बेळगे,ॲड.सुरेंद्र घोडजकर,  विजय येवनकर, संजय पांपटवार, विठ्ठल पा.डक, राहुल हंबर्डे, उमेश पवळे, ,मुन्तजिबब, मुन्ना अब्बास, कविताताई कळसकर,डॉ.रेखाताई चव्हाण, संगिता पा.डक, शेख हुसेन, नागनाथ गड्डम, राजू काळे, किशन कल्याणकर, महेंद्र पिंपळे, भि.ना. गायकवाड, डॉ. नरेंद्र रायेवार, किशोर भवरे, दुष्यंत सोनाळे, जी.नागय्या, विरेंद्र गाडीवाले, मंगेश कदम, अब्दुल लतिफ, अब्दुल हफिज, प्रफुल्ल सावंत, अमोल डोंगरे,संजय देशमुख लहानकर, संजय वडजे, बालाजी गव्हाने, देवराव पांडागळे, अनिताताई हिंगोले, सुमती व्याहाळकर, मसूद अहेमदखान, नवीन राठोड, लक्ष्मण जाधव, अतुल वाघ, व्यंकट मुदिराज, तिरुपती कोंढेकर, विठ्ठल पावडे, नितीन पा.झरीकर, मारोती किरकन,  ,संतोष बोन्लेवाड, शमीम अब्दुल्ला, अनुजा तेहरा, विजय देवडे, अनिल कांबळे, संजय वाघमारे, अरुणा पुरी, छायाताई कळसकर, सौ. शहाणे, डॉ.अर्शिया बेगम, कविता चव्हाण, सुमन राठोड, सौ.झंपलवाड, ॲड.बाळकृष्ण शिंदे, सुभाष काटकांबळे, उमेश सरोदे, नरेंद्रसिंग गाडीवाले, इंजि. नसिम जावेद पठाण, खान अब्दुल अलीमखान, नुरुल्ला खान, अलका शहाणे, शाहीन समदानी,सय्यद शेरअल्ली, अब्दुल गफार अब्दुल सत्तार, अब्दुल लतिफ अब्दुल माजीद, महम्मद नासेर, सुरेश लाटकर, धीरज यादव, संदिप सोनकांबळे,प्रल्हाद माटे, मुसबीर खतीब,शिवराज कांबळे,विनोद कांचनगिरे, किशन रावणगावकर, संतोष कांचनगिरे, प्रा.शशिकांत हाटकर, अशोक गोणारकर, नामदेव पद्मने, भगवान जोगदंड, गौतम शिरसाठ, शेख अस्लम, राजू लांडगे, सत्यपाल सावंत, हणमंत माळेगावकर, गुरुनाथ पा. पाळेकर, नरवाडे, संजय लोणे,धम्मा कदम, पाशाभाई, अंबादास रातोळे, सुभाष रायबोले, अमिसिंग तेहरा, प्रशांतअण्णा तिडके, मतूल पेद्देवाड, रवि कावलगावे, राजू शेट्टे,रहिमखान, रफिक पठाण, अजीम शेख, मुन्वर शेख, बालाजी चव्हाण, सय्यत नौशाद, करणसिंघ खालसा, राजकमलसिंघ गाडीवाले, उमाकांत पवार,जावेद चाऊस,खय्युम (बाबासेठ) बागवान, नईमभाई व इतर असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
  
देशात आता परिवर्तन- काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर
यावेळी बोलताना माजी आ. अमरनाथ राजूरकर म्हणाले की ,हिमाचल प्रदेशात काँग्रेसची एक हाती सत्ता यातून देशात आता परिवर्तन होणार असेच चित्र निर्माण झाले आहे. राजस्थान व छत्तिसगड विधानसभा पोट निवडणुकीसह देशभरातील पोट निवडणुकीत काँग्रेस व मित्रपक्षांचे उमेदवार विजयी झाले असून भाजपचा प्रभाव झाला आहे.

या निवडणुकीतून पुन्हा आप ,एम आय एम भाजपची बी टीम असल्याचे दिसून आले या दोन्ही पक्षाच्या माध्यमातून समविचारी मतांची विभागणी करून भाजपाने गुजरात येथे विजय मिळवला आहे. दिल्ली -गुजरात निवडणुकीत आप व भाजपने तडजोड केली दिल्ली आप तर गुजरात भाजप असे त्यांचे गणित होते. मात्र देशात आता परिवर्तन अटळ असल्याचा विश्‍वास काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर यांनी व्यक्त केला. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी