खाण्यापिण्याच्या भांडणाचा राग मनात धरून केला खून
कंधार| तालुक्यातील रेखातांडा येथील लक्ष्मण पांडुरंग राठोड वय 41 वर्ष व्यवसाय शेती यांचा खाण्यापिण्याच्या भांडणावरून लक्ष्मण थावरा चव्हाण रा. पोमातांडा यांनी मारून टाकल्याची घटना घडली आहे.
तालुक्यातील कुरुळा येथे दर गुरुवारी बाजार भरतो. मयत लक्ष्मण पांडुरंग राठोड हा बाजार करण्यासाठी कुरुळा येथे गेला. बाजार करून घरी आल्यावर पोमातांडा येथील आरोपी लक्ष्मण थावरा चव्हाण व मयत लक्ष्मण पांडुरंग राठोड यांनी मिळून बाजारातून खाण्यासाठी मासे आणले. त्याची भाजी करून खातांना दोघांची भांडणे झाली. या भांडणाचे पर्यवसान वाढून आरोपी लक्ष्मण चव्हाण यांनी मला घरी सोडून ये असा बहाना करून लक्ष्मण राठोड यांना घरून घेऊन गेला. आणि दादाराव केंद्रे यांच्या शेततळ्यातील विहिरीत लक्ष्मण पांडुरंग राठोड याना ढकलून देऊन खून केला आहे.
याबाबतची फिर्याद नातेवाईकांनी दिल्यावरून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन दिवसाच्या प्रतीक्षेनंतर दिनांक तिन डिसेंबर रोजी सायंकाळी पांडुरंग राठोड यांच्या फिर्यादीवरून भांदवी 302 कलमाने गुन्हा दाखल झाल्यानंतर आज सकाळी नातेवाईकांनी प्रेतावर अंत्यसंस्कार केले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर हे करीत आहेत.