नांदेड| राष्ट्रीय परीक्षा एजन्सी द्वारा घेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या युजीसी नेट २०२२ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुगाव (बु.) ता. जि. नांदेड येथील कार्यरत प्राथमिक पदवीधर शिक्षक श्री ज्ञानेश्वर यादवराव मरकंटे यांनी शिक्षणशास्त्र विषयात नेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
२०१८ ला त्यांनी शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षाही उत्तीर्ण केली असून २०२० ला मराठी विषयात नेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत व नुकत्याच लागलेल्या २०२२ च्या निकालात शिक्षणशास्त्र विषयात नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचे नांदेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नागराज बनसोडे, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, शंकर मनाळकर, परमेश्वर गोणारे, रुस्तुम शेख, संग्राम कांबळे, गुलाब राऊत, नागनाथ गंगासागरे, संग्राम केंद्रे, नितीन दुगाने, डॉ. भगवान गुंजलवाड, दादाराव कोठेवाड, महादेव तांदळे, डॉ. संदीप काळे, शिवाजी बैनवाड, राहुल गायकवाड, बंडोपंत लोखंडे, विठ्ठलराव ताकबिडे, शिवाजी नाईकवाडे, गंगाधर मंत्रे, राजेश्वर जल्लावार, माधव रेडेवाड, गिरधारी मोळके, गिरीश येवते, सुधाकर पाटील, रामचंद्र बोईनवाड, आनंदा रेजितवाड, वसंत कलंबरकर, विश्वनाथ चंदेलवाड, श्रीकांत खानापूरकर यांनी त्यांचे अभिनंदन केले असून इतर सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.