नांदेड| आशीर्वाद कपडा बँक आणि डोईजड अण्णा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या विमुक्त समाजाच्या पालावरील लोकांना, गोरगरीब, गरजूवंत परिवारातील सदस्यांना लहान मुलांचे कपडे, मुलींसाठी पंजाबी ड्रेस, महिलांसाठी साड्यांचे वाटप करण्यात आले.
जवळपास 250 गरीब व गरजूवंत परिवारास ते ज्या ठिकाणी भटक्या विमुक्त समाजाच्या पालावर राहतात त्या ठिकाणी जाऊन कपड्यांचे वाटप करण्यात आले. यात घरातील सर्वच सदस्यांना जसे की लहान मुले, मुली, महिला यांना कपड्यांचे वाटप करून सामाजिक बांधिलकीचे कार्य केले.
यावेळी आशीर्वाद कपडा बँक व डोईजड अण्णा फाऊंडेशनचे भटक्या विमुक्तांचे युवा नेते सुनील अण्णा डोईजड, उद्योजक कचरूशेठ बजाज, देवीदास हादवे, नागनाथ औंढेकर, संतोष हादवे, गोविंद लड्डा, सौ. रोहिणी लड्डा, सौ. रिता बाहेती, कु. पायल धूत, आदेश सारस्वत, गणेश चव्हाण, शरद मांगीलवार, रूचिरा मुखेडकर, किरणसिंग व पालावरील शाळेतील शिक्षक रावले, शिक्षिका कुरी मॅडम आदींची उपस्थिती होती.