हिमायतनगर। युवा प्रवासी भारतीय दिवस 2023 निवडी च्या अनुषंगाने स्वा. रा. ती. म. विद्यापीठाच्या रा. से. यो. विभागाच्या वतीने जिल्हास्तरावरील प्रथम निवड चाचणी नुकतीच नांदेड येथील इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालयामध्ये घेण्यात आली.
या चाचणी दरम्यान जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयाच्या स्वंयसेवकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धा चाचणी मध्ये आमच्या हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा उत्कृष्ट वक्ता व संवाद कौशल्य असलेला स्वंयसेवक निलेश चटणे याची गुनानुक्रमे पूढील विद्यापीठ निवड स्पर्धेसाठी निवड झाली.
या निवडीबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम यांनी त्याचे भरभरून कौतुक व अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे, सह कार्यक्रमाधिकारी डॉ. एल. बी. डोंगरे, स्टाॅफ सेक्रेटरी डॉ. डी. के. कदम, कार्यालयीन अधीक्षक श्री संदीप हरसूकर तसेच सर्व प्राध्यापक वर्ग, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.