भोकर, गंगाधर पडवळे। मुदखेडच नव्हे तर नांदेड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या करणानी लोकाभिमुख असलेले भारतीय जनता पार्टीच्या दि.वि.आ. मराठवाड्याचे विभागीय प्रभारी प्रवीण गायकवाड यांचा नावलौकिक कायम ठेवण्याची किमया त्यांची सुकन्या कु. आपुलकी प्रवीण गायकवाड हिने अंतर राज्य ब्याटमिंटन स्पर्धेत सामूहिक रौप्य पदक मिळवून देऊन केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, पद्विका अभियांत्रिकी क्रिडा परिषद महाराष्ट्र राज्य पुणे या शासकीय संस्थेच्या वतीने हिंगोलीच्या शासकीय पद्विका अभियांत्रिकी मैदानावर विविध क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेसाठी नांदेड येथून ग्रामीण अभियांत्रिकी (पॉली टेक्निक)आणि व्यवस्थापन (म्यानेजमेंट )संस्था, विष्णुपुरी नांदेड येथून ब्याटमिंटन या स्पर्धेसाठी संघ पाठविण्यात आला होता.या संघाने राज्यातील जवळपास बारा संघाना धूळ चारत नांदेड लातूर अस्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवीला आणि लातूर संघाकडून निसटता पराभव स्वीकारत रौप्य पदकाचा मान नांदेड ग्रामीण अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन संस्थेच्या शिरपेचात रोवाला आहे.
या संघांसाठी लूंबिनी नगर मुदखेड येथील आपुलकी प्रवीण गायकवाड ही अभियांत्रिकी प्रथम वर्ष इलेक्ट्रिक पद्विका अभ्यासक्रमास शिकत असलेली विद्यार्थिनी तसेच संघनक अभियांत्रिकी प्रथम वर्ष शाखेत शिकत असलेल्या कु.दिशा अग्रवाल व कु.रुद्रानी ढाचावार या तीन विद्यार्थीने नेत्रदीपक ब्याटमिंटन खेळाचे सादरीकरण करून नांदेड जिल्ह्याचा नावलौकिक राज्याच्या पातळीवर रौप्य पदक (शिलव्हर मेडल)मिळवून केला आहे.
या सांघिक रौप्य पदकामुळे प्रवीण गायकवाड हे नाव राजकारणा बरोबरच आता क्रिडा क्षेत्रातही कु. आपुलकीचे वडील या अर्थाने समाज माध्यमांवर चर्चील्या जात आहे. कु.आपुलकी प्रवीण गायकवाड हिच्या सांघिक येशामुळे मुदखेड तालुक्याचाही सन्मान झाला आहे. या यशाबद्दल सामाजिक,राजकीय आणि विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.