हलाल उत्पादनांवर बहिष्कार टाकून, हलाल प्रमाणपत्राचा पैसा कुठे जातो याची चौकशी झाली पाहिजे - सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती -NNL


नांदेड|
‘हलाल’ अर्थव्यवस्थेमुळे भारतीय अर्थव्यवस्था तथा सुरक्षा यांना धोका असल्याचे सांगताना श्री. घनवट म्हणाले की  भारत ‘सेक्युलर’ देश असतांना देशात धर्माच्या नावावर समांतर अशी ‘इस्लामी अर्थव्यवस्था’ हलाल प्रमाणपत्राद्वारे निर्माण केली जात आहे. या हलाल अर्थव्यवस्थेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला, तसेच राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. अशा हलाल अर्थव्यवस्थेला विरोध करण्यासाठी राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यांत ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ स्थापन करण्यात येणार आहे.

‘हलाल प्रमाणपत्र’ केवळ मांसापुरते मर्यादित न रहाता खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, औषधे, रुग्णालये, गृहसंस्था, ‘मॉल’, यांसाठीही लागू केले जाऊ लागले आहे. व्यापार्‍यांना आवश्यकता नसतांनाही प्रत्येक उत्पादनासाठी 47 हजार रुपये शुल्क भरून ‘हलाल प्रमाणपत्र’ आणि त्याचा ‘लोगो’ विकत घ्यावा लागत आहे. भारत शासनाच्या अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI)  या संस्थेकडून प्रमाणपत्र देण्याची अधिकृत व्यवस्था असतांना खाजगी मुसलमान संस्थांकडून हे प्रमाणपत्र का आणि कशासाठी घ्यायचे ?

देशातील केवळ 15 टक्के असणार्‍या मुसलमान समाजाला इस्लामवर आधारित ‘हलाल’ हवे आहे; म्हणून उर्वरित 85 टक्के गैरइस्लामी जनतेवर ते लादणे हे त्यांच्या संविधानिक धार्मिक अधिकारांच्या आणि ग्राहक अधिकारांच्या विरोधात आहे. तसेच ‘मॅकडोनॉल्ड‘, ‘के.एफ.सी.’ यांसारख्या ज्या ज्या खाजगी बहुराष्ट्रीय आस्थापनांकडून 100 टक्के ‘हलाल’ पदार्थांची विक्री होत आहे. तेही आता पूर्णपणे बंद झाले पाहिजे. या सर्व प्रकारांच्या विरोधात जिल्ह्याजिल्ह्यांत ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ स्थापन करून जनता आणि व्यापारी यांच्यामध्ये जागृती करण्यात येणार आहे. या उपक्रमात राष्ट्रप्रेमी नागरिकांनी  सहभागी व्हावे, असे आवाहन घनवट यांनी केले. 

‘हलाल जिहाद’ विषयी स्थानिक स्तरावर जागृती होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, यासाठी अधिवक्ता, व्यापारी आणि सामान्य हिंदु ग्राहकां पर्यन्त जाण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याचे श्री. गणेश सिंह ठाकूर यानी या प्रसंगी सांगितले. अक्षय भोयर-पाटील म्हणाले की आज समाजातील अनेकाना हलाल प्रमाणपत्रा विषयी माहिती नाहीये आणि त्यासाठी व्यापक मोहीम राबवणे आवश्यक आहे हे लक्षात घेवून त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. 

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशक-पूर्तीनिमित्त हिंदु राष्ट्र संकल्प अभियान !

‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियाना’त ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’, ‘हिंदु धर्माची महानता’, ‘शौर्य जागरणाची  आवश्यकता’, ‘लव्ह जिहाद’, ‘हलाल जिहाद’ इत्यादी विषयांवरील व्याख्याने,  हिंदु राष्ट्र जागृती करणारी फलकप्रसिद्धी करणे, मंदिरांची आणि ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता, महिला संघटनाचे उपक्रम आणि महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रम राबवण्यात येत आहेत. याशिवाय  ‘हिंदु राष्ट्र संघटन मेळावे’, ‘वर्धापनदिन सोहळे’, 'हिंदु राष्ट्र परिसंवाद' आणि अधिवक्ता बैठका आदी उपक्रम देशभरात राबवले जात आहेत. या उपक्रमांतून हिंदु समाजमनात हिंदु राष्ट्राचा संकल्प दृढ व्हावा आणि हिंदु समाजाने हिंदु राष्ट्रासाठी कृतीशील व्हावे, या दृष्टीने उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र – छत्तीसगड समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी केले. 

याप्रसंगी समितीचे उदय बडगुजर म्हणाले की, वर्ष 2002 मध्ये रत्नागिरीत एका धर्मद्रोही संघटनेने देवतांची टिंगल करणारा कार्यक्रम आयोजित केला होता, त्याच्या विरोधात उत्स्फूर्तपणे झालेले हिंदु संघटन आज 20 वर्षांत वटवृक्षासारखे वाढत चालले आहे. गेली 20 वर्षे सातत्याने केलेल्या जागृतीमुळे हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे विडंबन रोखण्यासाठी राज्यातच नव्हे, तर भारतभरात हिंदू कृतीशील झालेला दिसत आहे. धर्मशिक्षण, धर्मजागृती, हिंदूसंघटन, राष्ट्ररक्षण आणि धर्मरक्षण या पंचसूत्रीच्या आधारे समितीकडून वर्षभर विविध उपक्रम देशभर राबवले जातात. हे सर्व कार्य ईश्वरी कृपा, संतांचे आशीर्वाद आणि हिंदुत्वनिष्ठांचा कृतीशील सहभाग यांमुळे होत आहे. 

श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती(संपर्क क्र.: 70203 83264 )

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी