नांदेड। 14 नोव्हेंबर रोजी बालदिनाच्या निमित्ताने चंदामामा प्ले स्कूल, नांदेड येथे फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
दक्षिण मध्य रेल्वे महिला कल्याण संस्था / नांदेडचे व्यवस्थापन रेल्वे कर्मचारी आणि सांगवी आणि चैतन्य नगर परिसरातील लोकांच्या फायद्यासाठी ही शाळा डी.आर.एम. ऑफिस कंपाऊंडमध्ये चालवते.
आजच्या कार्यक्रमात श्रीमती. ब्राह्मीनी देवी बुडारापू , सचिव / दक्षिण मध्य रेल्वे महिला कल्याण संस्था /नांदेड या प्रमुख अतिथी होत्या तसेच श्रीमती रोशनी, खजिनदार / दक्षिण मध्य रेल्वे महिला कल्याण संस्था / नांदेड या हि उपस्थित होत्या.
दक्षिण मध्य रेल्वे महिला कल्याण संस्था/नांदेड तर्फे चंदामामा प्ले स्कूल स्कूलला एक वॉटर कुलर भेट देण्यात आला आहे.