हिमायतनगर| प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी हिमायतनगर रेल्वे स्थानक रस्त्यावर असलेल्या शिव नागनाथ मंदिरात चातुर्मास उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, याची सुरुवात कार्तिक कृष्ण पंचमी शके १९४४ दि.१३ रविवार पासून होणार आहे.
शहरातील रेल्वे स्थानक रस्त्यावर असलेल्या शिव नागनाथ मंदिरात चातुर्मास वार्षिकोत्सव दि.१३ नोव्हेंबर राविवारी सकाळी ११ वाजता अभिषेक, महापूजा व सत्यनारायण पूजा करण्यात येऊन उत्सवाची सुरुवात केली जाणार आहे. झेंडा व लॉड जागेची पूजा, सायंकाळी ७.३० वाजता कांतागुरु महाराज वाढोणा यांचे प्रवचन त्यानंतर संत देवमाय भक्तगनासः अग्नी प्रवेश करेल. त्यानंतर महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम संपन्न होईल.
दि.१४ रोज सॊमवार सकाळी ८ वाजता शिवनागानाथ मंदिरातून तुळशी वृंदावन कलशासह पालखी मिरवणूक ढोल तश्याच्या गजरात शहरातील मुख्य रस्त्यावरून निघणार आहे. सदर मिरवणूक हि शहरतील सर्व देवी-देवतांचे दर्शन घेत पुन्हा शिव नागनाथ मंदिराजवळ परत येवून समारोप होईल. त्यानंतर हभप बापूराव महाराज (ठाकूर बुवा) यांचे काल्याचे कीर्तन व दुपारी २ ते ५ वाजेच्या दरम्यान महाप्रसादाचे वितरण होईल. या भक्तिमय कार्याकार्मात शहरातील तमाम महिला, पुरुष भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन संत देवमाय, संयोजक मोहन सातव, सदाशिव सातव, अध्यक्ष सुदर्शन पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.