प्रेम आणि नृत्याच्या जुगलबंदीतून नांदेडच्या तरूण-तरूणीने केले मराठी गीतातून पदार्पण - NNL

सांग ना गं... हे गीत यु-ट्युब चॅनलवर होणार देशभर प्रदर्शीत


नांदेड|
नांदेडच्या आणखी एका तरूण-तरूणीने मराठी सिने जगतात पाऊल टाकले असून प्रेम आणि नृत्याच्या जुगलबंदीतून तयार केलेले मराठी गीत सांग ना गं... हे यु ट्युब चॅनलवर देशभर प्रदर्शीत होणार असल्याने नांदेडच्या सांस्कृतीक वैभवात भर पडणार आहे. 

नांदेडच्या अनेक तरूण-तरूणीने मराठी सिनेमा जगतात चित्रपट, गीत आणि दिग्दर्शनातून नाव लौकीक मिळवला आहे. त्यात सुमीत कांबळे यांनी प्रस्तूतच नव्हे तर गायन व अभिनय करून चांगली सुरूवात केली. सांग ना गं... हे मराठी गीत प्रेम आणि नृत्याच्या जुगलबंदीतून तयार करण्यात आले आहे. यात सुमीत कांबळे व नंदीनी पाडमुख हिने अभिनय तर केलाच शिवाय गीताचे गायक ही आहेत. गाण्याचे दिग्दर्शन सुमीत कांबळे, प्रॉड्युसर म्हणून श्याम कांबळे तर नृत्य दिग्दर्शन सुमीत कांबळे, भीमा थोरात, तुशार जाधव यांच्यासह पंकज कुमार व आशीष इंदूरकर यांचे सहकार्य लाभले. 

सदरील गाण्याच्या यशस्वीतेसाठी अजय गायकवाड, दया वाघमारे, अजय ठाकूर, नितीन केंद्रे, जॉली हनुमंते, सुनील बाळकडू, अतुल पांढरे, आशीष ठाकूर, सिद्धांत वाघमारे, रामनाथ कदम, दिनेश भगत, अलीम कुरेशी, सुशांत तुंबलवाड, गौरव जोंधळे, सिद्धी पारेख, वर्षा कांबळे, दिपाली मेटकर, प्रिया राठोड, आरती भालेराव, श्रद्धा करवंदे, रवि शिंदे यांनी मेहनत घेतली. सदरील गाणे यू-ट्युबवर देशभर प्रदर्शीत होणार असून सर्वांनी नवीन गीतासह सिने जगतात पदार्पण करणार्‍या नायक-नायकांना गीत पाहून आशीर्वाद देण्याचे आवाहन करण्यात आले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी