नविन नांदेड। शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या भारतीय कामगार नांदेड जिल्हाप्रमुख पदी निष्ठावंत शिवसैनिक ब्रिजलाल उगवे यांच्यी नियुक्ती झाल्या बद्दल सिडको परिसरातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सत्कार करून आगामी कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
सिडको परिसरातील निष्ठावंत शिवसैनिक ब्रिजलाल उगवे यांच्यी उध्दव ठाकरे गटाच्या भारतीय कामगार सेनेच्या नांदेड जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर नांदेड शहर व सिडको हडको परिसरातील शिवसैनिक यांनी जल्लोष व्यक्त केला. 19 नोव्हेंबर रोजी 22 रोजी हडको येथील निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत माझा शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्वच कार्यकर्त्यांनी शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला.
यावेळी उपशहर प्रमुख जितू सिंह टाक, माजी शहरप्रमुख साहेबराव दादा मामीलवाड ,निवृत्ती मामा जिंकलवाड ,कृष्णा पांचाळ, संदीप जिल्हेवाड ,अरुण पांचाळ, मनमथ मुकटकर, तुकाराम पांचाळ, अँड अरुण रिसनगावकर, उपशहरप्रमुख गणेश जयस्वाल , महिला आघाडीच्या तालुका संघटक निकिता शहापूरवाड, आनंदा वाघमारे ,मारुती जोंधळे, संजय मुळे ,अजय वाईकर,नागेश अष्टुरकर, दीपक आष्टुरकर ,अभिमन्यू पंडित यांनी सत्कार करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.