हदगाव| दिव्यांगाच्या विविध मागण्या करिता दिव्यांग विकास संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष समीर पटेल यांनी हदगांवचे तहसिलदार जिवराज डापकर व उपविभागीय अधिकारी आणि इतर सर्व संबंधित प्रशासनाला दिव्यांगाच्या विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.
दिव्यांगाचे प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत 3 डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणुन सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात साजरा करावा. नविन दिव्यांग मंत्रालयात शिपाई पासुन ते सचिवापर्यंत सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. दिव्यांग व्यक्तीला एस.टी. बस प्रवास हा निशुल्क द्यावा. दिव्यांग व्यक्तीला दिनांक 21 डिसेंबर 2020 च्या शासन निर्णयानुसार दिव्यांगाला अंत्योदय राशन कार्ड व राशन त्वरित लाभ द्यावा. ग्राम पंचायत, नगर पंचायत, नगर पालिकेच्या हद्दीतील शासकीय व निमशासकीय कार्यालयात व मुख्य ठिकाणी दिव्यांगाला व्यवसाय करिता 200 स्क्वेअर फुट जागा उपलब्ध करून स्वयं रोजगारासाठी जागा द्यावे. दिव्यांग व्यक्तीला प्रथम प्राधान्याने घरकुल योजनेत त्वरित लाभ घ्यावा.नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग व वयोवृद्ध आणि विधवा करिता संजय गांधी निराधार योजनेचे विशेष शिबिराच्या आयोजन करावे.
संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृद्धपकाळ योजना व इंदिरा गांधी योजनेतील सर्व लाभार्थ्याचे मासिक अनुदान हे पाच हजार रुपये प्रमाणे वाढ करावे, व तसेच दरमहा अनुदान वेळेवर त्यांच्या खात्यावर जमा करावेत. महाराष्ट्र रोजगार हमी योजने अंतर्गत दिव्यांगाला जॉब कार्ड देऊन त्यांना त्यांच्या गावातच किमान शंभर दिवस रोजगार उपलब्ध करून द्यावा. ग्राम पंचायत, नगर पालिका, मनपाच्या स्व उत्पन्न व पंधराव्या वित्त आयोगानुसार आणि स्थानिक विकास मतदारसंघातील आमदार खासदार यांनी दिव्यांग व्यक्तीवर पाच टक्के निधी तात्काळ खर्च करावा. नांदेड जिल्ह्यात जेथे दिव्यांग बोर्ड चालु आहे तिथे सर्व दिव्यांग प्रवर्गातील मुक बधिर, मतिमंद, नेत्रहीन, पक्षघात थॅलेसिमीया इतर सर्व प्रवर्ग दिव्यांगाची तपासणी करून त्वरित दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात यावे.