उस्माननगर, माणिक भिसे| काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात दाखल होत असलेल्या भारत जोडो पदयात्रेत लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील उस्माननगर परिसरातील हजारो कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती पत्रकारांशी संवाद साधताना माहिती माजी सरपंच प्रतिनिधी तथा सामाजिक कार्यकर्ते तथा आल्पसंख्याक काॅग्रेस पक्षाचे कंधार तालुका उपाध्यक्ष आमिनशा फकीर यांनी बोलताना देण्यात आली.
भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात दाखल होणार आहे. या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे हात बळकट करण्यासाठी मुस्लिम समाजातील युवक, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.गावातून कार्यकर्ते यांची जाण्याची सोय केली आहे.त्यामुळे एकजूटीने सर्व बांधव पदयात्रेत शामिल होऊन " मी पण चालणार" भारत जोडो पदयात्रे सहभाग घेणार आहेत.
लोहा कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील २० कार्यकर्त्यांचा ग्रुप तसेच एनएसयूआयचे मुस्लिम बांधव कार्यकर्ते यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी आ. अमरनाथ राजूरकर, कंधार तालुक्याचे अध्यक्ष बालाजी पांडागळे ,माजी सभापती सौ.लक्ष्मीबाई घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली कंधार, लोहा, विधानसभा मतदारसंघातील व उस्माननगर परिसरातील काँग्रेसचे पदाधिकारी , कार्यकर्ते मुस्लीम बांधव युवक सहभागी होणार आहेत.