पुणे| ज्ञानप्रबोधिनी माजी विद्यार्थी मंडळाच्या कला विषयक विशेष उद्दीष्ट गटाकडून १२ व १३ नोव्हेंबर रोजी लोकनृत्य (मध्य प्रदेश व राजस्थान) ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
ही कार्यशाळा ज्ञान प्रबोधिनी भवन ( सदाशिव पेठ ) च्या उपासना मंदिरात दुपारी १२ ते ५ या वेळात होणार असून सुप्रसिद्ध कथक व लोकनृत्य नर्तक संजय महाजन हे मार्गदर्शन करणार आहेत. मटकी,घुमर,गणगौर हे नृत्य प्रकार तसेच या लोकनृत्यांचा इतिहास, प्राथमिक पदन्यास, गीतांवरील नृत्य शिकवले जाणार आहे.
सर्व कलाप्रेमींसाठी ही सशुल्क कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.कला गटाच्या वतीने डॉ.वैदेही केळकर व मिलिंद संत यांनी या पत्रकाद्वारे ही माहिती दिली. नाव नोंदणीसाठी ९८९०८१३७७६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.