17 नोव्हेंबर 2022 पर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
नांदेड| उच्च व तंत्रशिक्षण विभाग,ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य् नगर भवन मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,नांदेड यांच्या संयुक्त विदयमाने दिनांक 19 व 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीत आयोजित दोन दिवसीय नांदेड ग्रंथोत्सव-2022 निमीत्त माध्य्मीक विदयार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
"आजची समाज माध्यमे व वाचन संस्कृती " हा स्पर्धेचा विषय असून ही माध्यमिक विदयार्थ्यासाठी आहे.ही स्पर्धा 20 नोव्हेंबर 2022 रोजी 2 ते 4 वा जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह शेजारी श्री.गुरु गोंविदसिंघजी स्टेडीयअम परीसर,नांदेड येथे होणार आहे.स्पर्धेचे विषय व अटी पुढील प्रमाणे आहे.
प्रत्येक स्पर्धकाला भाषणासाठी 6 मिनिटे (5+1) देण्यात येतील.स्पर्धकांची पुरस्कारासाठी निवड केली जाईल. भाषणासाठी स्पर्धकांच नाव पुकारल्यावर स्पर्धक हजर असला पाहिजे. मराठी भाषेत भाषण करावे लागेल. कोणत्याही माध्य्मीक विदयालयातील दोन स्पर्धकांना प्रवेश दिला जाईल.मान्यवर परीक्षकांनी दिलेल्या भाषणातील सरासरी गुणांवरुन पारितोषिक दिले जातील.प्रथम क्रमांक रु 1000/-, ग्रंथ व प्रमाणपत्र,व्दितीय क्रमांक पारितोषिक रु 500/-, ग्रंथ व प्रमाणपत्र,त्तृतिय क्रमांक पारितोषिक रु 300/- ग्रंथ व प्रमाणपत्र व उत्तेजनार्थ रु 200/-ग्रंथ व प्रमाणपत्र पारितोषिक विजेत्यांना ग्रंथोत्सवाच्या लगेचच होणा-या समारोप समारंभात प्रदान करण्यात येतील.
नाव नोंदणीसाठी नांदेड जिल्हयातील माध्य्मीक विदयालयांनी मुख्यध्यापकांच्या स्वाक्षरीच्या पत्रासह (नाव,शाळा,वर्ग इत्यांदीसह ) दोन विदयार्थ्यांची स्पर्धक म्हणून प्रवेशिका (नाव नोंदणी) दिनांक 17.11.2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा ग्रंथालयात लेखी नोंद केली पाहिजे. नंतर आलेल्या प्रवेशिका स्विकारता येणार नाही. कोणत्याही परिस्थितीत नंतर भाषणासाठी केलेल्या विनंतीला मान्य् करता येणार नाही.स्पर्धकाला प्रवेशाच्या वेळी ओळखपत्र आसणे आवश्य्क आहे.स्पर्धाकास कोणतीही प्रेवेश फि नसून कोणताही प्रवास भत्ता देय होणार नाही याची नोंद घ्यावी.
नाव नोंदणी स्पर्धकासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह,श्री गुरु गोविदसिंघजी स्टेडीयअम परिसर,नांदेड या प्रत्यावर किंवा भ्रमणध्वनी क्रमांक 9421868639 ई-मेल dlonanded.dol@maharashtra.gov.in येथे संपर्क साधावा या स्पर्धेसाठी नांदेड जिल्हयातील सर्व उच्च् माध्य्मीक विदयालयाच्या विदयार्थ्यांनी/इच्छूकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री.प्रताप सुर्यवंशी यांनी केले आहे.