नांदेड| प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने सोमवार 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2022 या कालावधीत स्कूल बस तपासणीची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या विशेष मोहिमे दरम्यान सर्व स्कूल बस चालक-मालक यांनी त्यांच्या वाहनाचे सर्व वैध कागदपत्रे वाहनासोबत ठेवावीत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.
या मोहिमेदरम्यान स्कूल बस वाहन तांत्रिकदृष्ट्या दोष मुक्त व सुस्थितीत ठेवावे. वाहनाचे कागदपत्र वैध नसल्यास वैध करून घ्यावीत. या मोहिमेत दोषी आढळणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच स्कूल बसद्वारे वाहतूक करताना विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची सर्व स्कूल बस मालक चालक यांनी दक्षता घ्यावी. शाळेचे मुख्याध्यापक हे शालेय स्कूल बस परिवहन समितीचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्या अखत्यारीतील स्कूल बस मधून नियमानुसार विद्यार्थी वाहतूक करावी, असेही परिवहन विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.