नांदेड। श्री गुरुजी रुग्णालय, छत्रपती चौक, नांदेड येथे दि. २० नोव्हेंबर २०२२ रोजी ० ते ६ वयोगटातील बालकांना मोफत सुवर्णप्राशन आणि बालक व स्त्रियाची मोफत आरोग्य तपासणी त्यानुषंगाने भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदरच्या शिबिरास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. त्यामध्ये २२० बालकांना मोफत “सुवर्णप्राशन” आणि ११८ “माता आणि बालकांची” मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी ऊर्जा आयुर्वेदाचे संचालक वैजनाथ स्वामी यांनी या शिबीरास उपस्थिती लावली तसेच ऊर्जा आयुर्वेदाच्या वतीने शक्य ते सहकार्याचे आश्वासन दिले.
प्रस्तुत कामे डॉ. लक्ष्मिकांत बजाज यांच्याकडून बालकांची तर डॉ. धनश्री केळकर यांच्याकडून मातांची तपासणी करण्यात आली त्याचबरोबर डॉ. शेखर चौधरी, डॉ. मेहबूब पठाण, डॉ. नेहा जोशी, डॉ. जयश्री ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्ण प्राशन संस्कार ० ते ६ वयोगटातील बालकांना देण्यात आले.
सदरच्या उपक्रमास जनतेचा प्रचंड प्रतिसाद लक्षात घेता अशाप्रकारची जनताभिमुख शिबिरे आणि जनहितार्थ आरोग्यविषयक उपक्रम वरचेवर राबविण्याचा मानस रुग्णालय व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे आणि या शिबिरास दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल सर्व शिबिरार्थ्या प्रती ऋण निर्देश अभिव्यक्त केले आहेत. सदर शिबीर यशस्वीतेसाठी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, अधिकारी व कर्मचारी वृंद यांचे मौलिक सहकार्य लाभले.