उस्माननगर, माणिक भिसे। काँग्रेसचे नेते खा.राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रा जिल्ह्यातून जात आहे. त्यामुळे कंधार लोहा शहरासह ग्रामीण भागातून तालुका काँग्रेसच्या वतीने युद्धपातळीवर 'यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे.
यात्रेचा संदेश खेडे, वाडी, गाव तांड्यावर पोहोचण्यासाठी ह्य हर घर हर गाव अभियान राबवण्यात येत आहे. या यात्रेत कंधार व लोह्यातील १५ हजार नागरिकांचा पदयात्रेत समभाग होणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते संतोष पांडागळे यांचे बंधू सामाजिक कार्यकर्ते बालाजी रामराव पाटील पांडागळे शिराढोणकर यांनी माहिती गावागावातून मंगळवारी दि. ८ रोजी भेटी दरम्यान दिली. भारत जोडो यात्रेचे नदिड जिल्ह्यात सोमवारी दि ७ रोजी आगमन झाले आहे. ही यात्रा शंकरनगर, नायगाव कृष्णुर मार्गे कौठा फाटा येथे मुक्कामी राहुन नदिडकडे रवाना होणार आहे. त्यासाठी गुरुवारी दि .१० रोजी सकाळी पावनेसहा वाजता कापशी गुंफा येथून पद यात्रेस प्रारंभ होणार आहे. पुढे मारतळा, काकांडी, , चंदासिंग कॉर्नर येथे दुपारी थांबा आहे..
महामार्गावर अनेक ठिकाणी यात्रेचे बॅनर लागले असून सर्वत्र वातावरण निर्मिती झाली आहे. यात्रा मार्गस्थ होताना महामार्गांच्या असणाऱ्या गावातील नागरिकांना ही यात्रा व राहुल गांधी यांना पाहण्याची उत्सुकता शिगेला पोचली आहे. या यात्रेसाठी कंधार तालुक्यातील १५ हजार नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती नांदेड जिल्ह्या काॅग्रेस पक्षाचे प्रवक्ते संतोष पांडागळे यांचे बंधू कंधार तालुक्यातील शिराढोण येथील सामाजिक कार्यकर्ते बालाजी रामराव पाटील पांडागळे यांनी सांगितले.