गटशिक्षणाधीकारी नागराज बनसोडे यांनी मुख्याध्यापकांना फक्त कारणे दाखवा नोटीस देवुन पांघरली चादर !
नांदेड। जि प प्रा शाळा नविन कौठा नांदेड या शाळेतील मुख्याध्यापक व त्यांचे सहकारी शिक्षक शैक्षणिक व आर्थिक गैरव्यवहार करत असल्याबाबतची तक्रार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद विद्यार्थी आघाडी जिल्हा नांदेड तर्फे जिल्हाध्यक्ष अॅड.संघरत्न गायकवाड व शिष्ट मंडळ यांनी गटशिक्षणाधिकारी नागराज बनसोडे साहेब यांना देण्यात आली होती.
मा.गट्शिक्षणाधिकारी पंचायत समिती, नांदेड यांचे पत्र क्र.1379 दिनांक 02/09/2022 अन्वये अॅड.संघरत्न गायकवाड जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद विद्यार्थी आघाडी जिल्हा नांदेड यांच्या दिनांक 30/08/2022 रोजी जि प प्रा शाळा नविन कौठा नांदेड येथील सन 2021-2022,2022-2023 मिळालेल्या शालेय अनुदान, शालेय गणवेश अनुदान, विनाआधार कार्ड प्रवेशित विद्यार्थी, बोगस अपंग शिक्षक, प्रतिनियुक्तीवर असलेल्या शिक्षकांची व मुख्याध्यापक यांच्या अनियमितते बाबत चौकशी करणे बाबतच्या निवेदना नुसार सखोल चौकशी करुन अहवाल सादर करणे बाबत चौकशी समीतीस आदेशित केल्यानुसार दिनांक 08/09/2022 रोजी जि.प.प्रा.शाळा नविन कौठा शाळेस भेट देवुन सखोल चौकशी करण्यात आली.
चौकशी समीतीने चौकशी अहवाल दिनांक 29/09/2022 रोजी गटशिक्षणाधीकारी कार्यालयास सादर केला असुन सदर अहवालानुसार मुख्याध्यापक यांनी खालील प्रमाणे अनियमितता केल्याचे दिसुन आल्याने संबंधीत शाळेचे मुख्याध्यापक आनंदराव जयवंतराव मुसांडे यांच्यावर फौजदारी कार्यवाही करणेसाठी कारणे दाखवा नोटीस देवुन जाब विचारला आहे.
• इयत्ता 3री मधील 2021 मधील 08 प्रवेशित विद्यार्थ्यांची नावे विद्यार्थी हजेरी पटावरुन टी.सी. दिल्याने 22.09.2021 व 23.09.2021 रोजी का कमी केले ?
• सप्टेबर 2021 मधील प्रवेशित इयत्ता 4 थी वर्गातील 06 व इयत्ता 05 वी मधील 09 अशा एकुन 11 विद्यार्थ्यांची नावे दि.05/07/2022 रोजी विद्यार्थ्यांची नावे विद्यार्थी हजेरी पटावरुन टि.सी. दिल्याने कमी केल्याचे आढळुन आले आहेत एकाच तारखेला 11 टि.सी. देण्याचे कारण काय ?
• शाळेतील शिक्षक अतिरिक्त ठरु नये या साठी 23 विद्यार्थी हे श्री.गुरुनानक विद्यामंदिर, शिवनगर नांदेड ता.नांदेड या शाळेतुन आलेल्या टी.सी.नुसार प्रवेशीत केल्याचे व संचमान्यतेमध्ये सदर विद्यार्थ्यांची माहीती भरुन संचमान्यता फॉरवर्ड सदर विद्यार्थ्यांचे नाव काढुन टाकल्याचे सिद्ध होत आहे ?
• सन 2021-2022 या वर्षामध्ये जि.प.प्रा.शाळा नविन कौठा या शाळेस गणवेश अनुदान 155 विद्यार्थ्यांसाठी रुपये 45,600/- प्राप्त झाले असुन सदर गणवेश खरेदी साठी नियमानुसार दरपत्रक मागविणे, तुलनात्मक तक्ता तयार करणे, पुरवठादारास पुरवठा आदेश देणे ही प्रक्रिया का केली नाही ?
• गणवेश खरेदी करीता दि. 21/01/2022 रोजीच्या शालेय व्यवस्थापन समिती सभेच्या ठरावावर 06 सदस्यांचे नावे असुन सर्वांच्या स्वाक्षरी एकाच अक्षरात केलेल्या दिसुन येत आहेत.याचा अर्थ गणवेश खरेदी करीता दि. 21/01/2022 रोजी शालेय व्यवस्थापन समितीची सभा न घेताच ठराव पुस्तीकेवर सभा घेतल्याचे दर्शविण्यात आले आहे.
• सन 2022-2023 गणवेश दि.18/08/2022 रोजी रुपये 91,800/- चे PPA जनरेट केले असुन दि. 08/09/2022 पर्यंत आपण शाळेस गणवेश खरेदी केली नसुन विद्यार्थ्यांना लाभापासुन वंचित का ठेवले ?
• सन 2021-2022 मध्ये शाळेतन आलेल्या इयत्ता 4 थी च्या 03 विद्यार्थिनीना गणवेश देण्यात आला आहे. तसेच इयत्ता 5 वी च्या शाळेत नसताना 08 विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय पोषण आहार देण्यात आलेला आहे.
• सिमरन कौर, प्रीती साळुंके, दिव्या चव्हण, तमन्ना शेख, पलक देशमुखे, जोया बेग, कोळुंके खंडु हे सात विद्यार्थी मागील दोन ते तीन वर्षापासुन शाळेत नाही असे वर्गातील विद्यार्थ्यांने सांगीतले. तरीही गणवेश प्राप्त म्हणुन सदर विद्यार्थ्यांची वाटप रजिस्टरवर सही आहे.
• आपण पदोन्नत मुख्याध्यापक या पदावर जि.प.प्रा.शाळा नविन कौठा नांदेड ता.नांदेड येथे दिनांक 29 जुलै 2021 रोजी उपस्थीत झाला असुन सन 2021-2022 च्या शालेय पोषण आहार रोकड वहीची तपासणी केली असता दिनांक 26/06/2021 पासुन ते आज पावेतो त्यांनी रोकड वही न खतवताच शा.पो.आ. बॅंक खाते क्रमांक 80043943722 महाराष्ट्र ग्रामीण बॅंक 4155 शाखा वाघाळा या खात्यातुन 12 धनादेश वितरीत केले आहेत.
• इयत्ता 2 री व 4 थी च्या विद्यार्थ्यांनी सांगीतले की, आपण कधीच व कुठलाही विषय शिकवित नाहीत.
वरिल बाबी अतिशय गंभीर असुन आपणाविरुद्ध महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम 1964 नुसार व मा.मुख्यकार्यकारी अधिकारी,जि.प.नांदेड यांनीप्रदान केलेले अधिकार जाक्र/जिपनां/साप्रवि/आस्था/2506/2015 दिनांक 23/07/23015 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार कार्यवाही का करण्यात येवु नये या बाबत आपला लेखी खुलासा या कार्यालयास उलट टपाली सादर करावा. लेखी खुलासा विहीत वेळेत प्राप्त न झाल्यास आपले काहीही म्हणने नाही असे गृहीत धरुन आपणा विरुद्ध वरील नियमानुसार कार्यवाही प्रस्तावित करण्यात यईल याची नोंद घ्यावी. अशी कुठलीही तात्काळ कार्यवाही न करता पाठीशी घालत फक्त कारणे दाखवा नोटीस नागराज बनसोडे गटशिक्षणाधीकारी पं.स. नांदेड यांनी दिली त्यावर मुख्याध्यापक आनंदराव जयवंतराव मुसांडे काय खुलासा देतील यावर स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.