सीटू आणि अ.भा.जनवादी महिला संघटनेचा तहसील कार्यालयास घेराव -NNL

विविध मागण्यासाठी केले एक दिवशीय उपोषण व धरणे आंदोलन


नांदेड|
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने दिनांक १० नोव्हेंबर रोजी नांदेड तहसील कार्यालयास तीन तास घेराव घालून नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

नांदेड तालुक्यातील रेशन व्यवस्था दिवसेंदिवस कोलमडत असून साधे रेशन कार्ड देखील खेटे मारल्याशिवाय मिळेनासे झाले आहे.रेशन कार्ड ,घरकुल देण्यात यावे, गृह कर्ज तसेच जेष्ठाना पेन्शन देण्यात यावे.महापालिकेतील कर्मचारी चांदोबा भिसे यांचे कर्तव्यावर असताना निधन झाले असल्यामुळे त्यांच्या कुटूंबियांना पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात यावी व मयत भिसे यांच्यावर दबाव टाकून मानसिक त्रास देण्याऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. 

शहरातील बोगस शिक्षण संस्था प्रजा बालक विद्या मंदिर शाळेवर कारवाई करावी. गट शिक्षणाधिकारी पं.स.नांदेड आणि शिक्षणाधिकारी जि.प.नांदेड हे कर्तव्यात कसूर करीत असल्यामुळे त्यांच्यावर दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे कारवाई करावी.शहरात आणि तालुक्यात अनेक अधिकारी अनेक वर्षांपासून तळ ठोकून आहेत.त्यांच्या बदल्या तात्काळ कराव्यात.उदाहरणार्थ जातपडताळणी कार्यालय, मनपा,जिल्हा परिषद, तहसील कार्यालय नांदेड येथील अधिकारी व कर्मचारी इत्यादी.

तहसीलदार उपस्थित नसल्याने शिष्टमंडळाने नायब तहसीलदार यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनावर कॉ.विजय गाभणे, कॉ. उज्वला पडलवार, कॉ. गंगाधर गायकवाड, कॉ.श्याम सरोदे,कॉ.करवंदा गायकवाड, कॉ.सुंदरबाई वाहूळकर,कॉ. लता गायकवाड, कॉ.जयराज गायकवाड,कॉ. केशव सरोदे,कॉ. नागेश सरोदे, कॉ.जयराज सरोदे,कॉ.देवानंद भिसे, कॉ. सोमाजी सरोदे,जितेंद्र सरोदे, दिलीप सरोदे, कॉ.राम सरोदे, शिक्षिका आशा गायकवाड आदींची उपस्थिती होती.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी