नांदेड। नांदेड शहर व परिसरातील सर्व नागरिकांना कळविण्यास आनंद होतो कि, नुकत्याच पार पडलेल्या बालदिनाचे औचित्य साधून येत्या रविवारी दि-२०/११/२०२२ रोजी आयोजित केलेल्या विशेष शिबिरात लहान बालक वयोगट ० ते ६ वर्ष यांच्या करिता मोफत “सुवर्णप्राशन” हा दुर्मिळ योग नांदेड शहरात कित्येक वर्षानंतर, श्री गुरुजी रुग्णालय, छत्रपती चौक, नांदेड यांनी जुळवून आणला आहे.
जन्मापासून ते ६ वर्षापर्यंतच्या बालकामध्ये शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासासाठी, त्वचेची कांती वाढवण्यासाठी, पचनशक्ती सुधारण्यासाठी, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, बदलत्या ऋतूनुसार होणारे आजार टाळण्यासाठी, सुदृढ प्रकृतीसाठी आवश्यक असणारे “सुवर्णप्राशन संस्कार” (प्राधान्यक्रमाने येणारे सुरुवातीचे २०० बालकाकरीता) सोबतच बालक व स्त्रियांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे.
मातासाठी- वंध्यत्व, गर्भव्यंगचिकित्सा, गर्भाशयाचे विकार, बाळंतपण, कुटुंबनियोजन, स्त्रियांच्या मासिक पाळीचे विविध आजार, PCOS व PCOD समस्या, स्तनाचा कर्करोग केस गळणे, ई. बालकासाठी - बालरोगाचे आजार निवारण, सतत सर्दी खोकला होणे, धाप लागणे, बाळ वारंवार रडणे, बाळ दुध पिताना थकणे, पोट व नखे निळसर होणे, वजन व उंची न वाढवणे, भूक न लागणे, मतीमंद असणे इत्यादी. रोगावर रुग्णालयात तज्ञ व कुशल डाँक्टरांच्या मार्गदर्शनाखाली दि-२०/११/२०२२ रोजी सकाळी. १०.०० ते दुपारी. ३-०० पर्यंत श्री गुरुजी रुग्णालय, छत्रपती चौक, नांदेड येथे “मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे” आयोजन करण्यात आले आहे.
तथापि “सुवर्णप्राशन” करिता शिबिरापूर्वीच नोंदणी केलेल्या बालकांना सर्वप्राथम्याने व प्राधान्यक्रमाने सुवर्णप्राशन करण्यात येईल करिता न चुकता नावनोंदणी करून ऐनवेळी होणारी गैरसोय वा धावपळ टाळावी आणि या शिबिराचा गरजवंत नागरिकांनी आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन श्री गुरुजी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून करण्यात येत आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी पुढील क्रमांक:- 9370638837, 02462-359699 संपर्क साधावा.
श्री गुरुजी रुग्णालय, छत्रपती चौक, नांदेड येथे मोफत सुवर्णप्राशन बालरोग व स्त्रीरोग आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन.
v सुवर्णप्राशनाचे फायदे
१. जन्मापासून ते ६ वर्षापर्यंतच्या बालकामध्ये शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासासाठी,
२. त्वचेची कांती वाढवण्यासाठी
३. पचनशक्ती सुधारण्यासाठी
४. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी
५. बदलत्या ऋतूनुसार होणारे आजार टाळण्यासाठी
६. सदृढ प्रकृतीसाठी
v स्त्रीरोग तपासणी शिबीर
१. गर्भव्यंगचिकित्सा
२. गर्भाशयाचे विकार
३. बाळंतपण
४. कुटुंबनियोजन
५. स्त्रियांच्या पाळीचे विविध विकार
६. केस गळणे
७. वंध्यत्व
८. PCOS व PCOD समस्या माहिती व उपचार
९. स्तनाचा कर्करोग
v बाळरोग तपासणी शिबीर
१. बालरोगाचे आजार निवारण
२. सतत सर्दी खोकला होणे
३. धाप लागणे
४. बाळ वारंवार रडणे
५. बाळ दुध पिताना थकणे
६. पोट व नखे निळसर होणे
७. वजन व उंची न वाढवणे
८. भूक न लागणे इत्यादी
९. मतीमंद असणे
ईत्यादि रोगावर रुग्णालयात तज्ञ व कुशल डाँक्टरांच्या मार्गदर्शनाखाली दि-२०/११/२०२२ रोजी सकाळी. १०.०० ते दुपारी. ३-०० पर्यंत श्री गुरुजी रुग्णालय, छत्रपती चौक, नांदेड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. तरी गरजूंनी शिबिराचा आवश्य लाभ घेण्याचे आवाहन, रुग्णालयाच्या व्यवस्थापना कडून जनहितार्थ करण्यात येत आहे. अधिक माहिती व नावनोंदणी साठी संपर्क:-9370638837/02462-359699 साधावा.