हिमायतनगर रेल्वे स्थानकावरील समस्या सोडविण्यासाठी डीआरएम साहेबानी लक्ष द्यावे -NNL

धनबाद एक्सप्रेसला हिमायतनगर येथे थांबा देऊन नंदीग्राम एक्सप्रेस नागपूर पर्यंत पूर्ववत करा

कोरोना काळापासून बंद करण्यात आलेल्या सर्व सुविधा स्थानकावर पुन्हा सुरु करा


हिमायतनगर, अनिल मादसवार|
तेलंगणा - विदर्भाच्या सीमेवर असलेल्या हिमायतनगर येथील रेल्वे स्थानक विविध समस्यांच्या विळख्यात अडकले आहे. येतील स्थानकावर येणाऱ्या प्रवाश्याना विशेषतः महिलांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. हि बाब लक्षात घेता कोरोना काळापासून बंद करण्यात आलेल्या सुविधा पुन्हा चालू करून दिलासा द्यावा. ज्यात प्रामुख्याने नंदीग्राम एक्सप्रेस  नागपूर पर्यंत पूर्ववत करणे, स्थानकावर शौचालय, प्रतिक्षालय, अनाउन्समेंट, दादर्यपर्यंत शेड वाढविने, पैसेंजर आणि मेल एक्स्प्रेस भांडयातील तफावत दूर करून सिनियर सिटीजन सुविधा, पोलीस चौकी स्थापन करून प्रवाश्याना सुरक्षा देण्यात यावी. तसेच दीक्षाभूमी कोल्हापूर -धनबाद एक्सप्रेस गाडी न. 11045 - 1046 ला हिमायतनगर रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.   

हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर देवस्थान ठिकाणाला तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे. येथून प्रवास कार्नार्त्यांची संख्या मोठी आहे, कारण विदर्भ सीमा 6 किमी अंतरावर  तर तेलंगणा सीमा 12 किमीवर आहे. हिमायतनगरच्या आजू बाजूला 109 खेडे विभागाचा परिसर आहे. या तालुक्यात सर्व धर्मीय लोक आणि विशेषतः मजुरदार, शेतकरी, व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. येथील स्थानकावर काही रेल्वे थांबतात तर दीक्षाभूमी कोल्हापूर - धनबाद एक्सप्रेसला स्टॉप नाही. त्यामुळे या गाडीला स्टॉप दिल्यास प्रवाशांना कोल्हापूर, पंढरपूर, बार्शी, तुळजापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, नागपूर, मुंबई, शिर्डी, परळी येथे देवदर्शन व रुग्णालयात जाण्याचा मार्ग कमी खर्चात सोयीचा होईल.   

हिमायतनगर रेल्वे स्थानकावर कोरोना काळानंतर विविध समस्या वाढल्या आहेत. येथील रेल्वे स्थानकांच्या नूतनीकरणाचे काम सुरु आहे, उड्डाण पूल झाला आहे. दुसऱ्या प्लॅटफॉर्मचे कामही प्रगतीपथावर आहे. मात्र येथूल रेल्वे स्टेशन मास्तर ऑफिस समोर असलेला शेड लहान असल्याने स्टेशन मास्तरच्या इमारतींसमोरील गैप भरून काढण्यासाठी शेडची रुंदी वाढविणे गरजेचे आहे. जेणेकरून स्टेशन मास्तरला पावसाळ्यात न भिजता आणि उन्हाळ्यात उन्हात न थांबता सेवा देता येईल. तसेच प्रवासाची होणारी अडचण दूर होईल. येथील स्थानकावर सार्वजनिक शौचालय, प्रतिक्षालय, सुरक्षेसाठी पोलीस चौकी, आणि शक्य तेवढ्या नवीन रेल्वे आणि हिमायतनगर स्टॉपवर रेल्वे थांबाण्याची वेळ वाढविण्यात यावि. येथील स्थानकावर रेल्वे कमिवेळ थांबत असल्याने चढता उतरताना अपघात होत आहेत. तसेच येथील पार्सल ऑफिस बंद असल्याने व्यापाऱ्याना अडचणीचा सामना करावा लागतो आहे ती सेवा सुरु करण्यात यावी. रेल्वे स्थानकावर बैठक व्यवस्थेचा अभाव आहे. त्यामुळे प्रवाश्यांना रेल्वेची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागते आहे. 

यासाठी रेल्वे स्थानकावर आसन व्यवस्था करणे आवश्यक आहे. सकाळ सायंकाळच्या वेळी प्लॅटफॉर्म स्वच्छतेसाठी सफाई स्टाफ कर्मचारी नेमून रेल्वे गाड्यांची अनाउन्समेंट सुविधा चालू होणे आवश्यक आहे. तसेच कोरोणापासून बंद पडलेल्या सर्व सेवा पुन्हा सुरू कराव्या. हिमायतनगर रेल्वे स्थानकावर पोलीस चौकी आवश्यक आहे, किनवट आणि मुदखेड येथे पोलीस चौकी असल्याने अपघात, घडल्यास हिमायतनगर स्थानकावर व परिसरात पोलीस घटनास्थळी यायला उशीर होत आहे. त्यामुळे येथे पोलीस चौकी उभारणे आवश्यक आहे. यामुळे प्रवाश्यांच्या सुरक्षेला वाव मिळेल व चोरीचे प्रकार थांबण्यास मदत होईल. तसेच नंदीग्राम एक्स्प्रेस नागपूरपर्यंत पूर्ववत चालू करण्यात यावी. हिमायतनगर स्थानकावर वेटिंग हॉल असुन, उघडले जात नाही, हे उघडून 24 तास चालू ठेवावे तसेच उच्च प्रतिक्षालय बांधून (उड्डाण पूल) दादर्यपर्यंत शेड वाढविने गरजेचे आहे. पैसेंजर आणि मेल एक्स्प्रेस रेल्वेचे भाडे सारखेच आहे, त्यामुळे पैसेंजर रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. तर सिनियर सीटजण सुविधा बंद असल्यामुळे ती पूर्ववत चालू करावी अशी मागणीही प्रवाशी वर्गातून केली जात आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी