भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातील फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे उदघाटन
पुणे| भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (ए.आय.सी.टी.ई)च्या ट्रेनिंग अँड लर्निंग अकँडमी(अटल )यांच्या सहयोगाने आयोजित फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे उदघाटन झाले.
माहिती तंत्रज्ञान आणि संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांच्याहस्ते आणि प्राचार्य डॉ. विदुला सोहोनी,डॉ संदीप वांजळे,डॉ सुनिता धोत्रे,शीतल पाटील,सचिन वाकुर्डेकर यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन कार्यक्रम झाला. भारती विद्यापीठ येथे ११ नोव्हेंबर पर्यंत हा राष्ट्रीय पातळीवरील फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रम चालणार आहे. देशभरातील अभियांत्रिकी महाविद्दयालयातील प्राध्यापक त्यात सहभागी झाले आहेत.
प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना डॉ.दीपक शिकारपूर म्हणाले,'प्रचलित शिक्षण पद्धतीतून सर्व अपेक्षित उद्दिष्टे साध्य होत नाहीत,त्यासाठी आंतरशाखीय शिक्षणाला वाव देणारे भविष्यकेंद्री शैक्षणिक धोरण तयार झाले पाहिजे. आपल्या क्षेत्रातील आणि अवती भवतीच्या समस्या सोडविण्याचा दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला पाहिजे.फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम मधून नवनवे विचारप्रवाह प्राध्यापकांपर्यंत पोहोचविणे सोपे होते.
त्यात डेटा सायन्सचा उपयोग करून घ्यायला हवा. त्याचा अंतिमतः विद्यार्थ्यांना लाभ होईल'. डॉ.विदुला सोहोनी म्हणाल्या ,'फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम मधून ज्ञान वृद्धीचे काम होते. प्रचलित औद्योगिक आणि शैक्षणिक प्रवाहांची माहिती अद्ययावत करण्यासाठी या प्रशिक्षण कार्यक्रमांचा उपयोग होतो .डेटा सायन्स बद्दल सखोल अभ्यास करण्यासाठीची दिशा या प्रशिक्षण कार्यक्रमातून तयार होईल'.