उस्माननगर। महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे यांच्या वतीने घेन्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२१ - २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला यामध्ये समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उस्माननगर ता.कंधार या शाळेतील दोन विद्यार्थ्यांनीनी पात्र ठरल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे मार्फत इयत्ता पाचवी व आठवी वर्गातील विद्यार्थ्यांनीनी घवघवीत यश मिळाले आहे.यामध्ये कु. श्रृद्धा बजरंग केंद्रे (५वी) व कु. कल्याणी विलास कैसल्ये (८वी) या दोन विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.त्या शिष्यवृत्तीस पात्र ठरल्या आहेत.
त्यांचा शाळेच्या वतीने मुख्याध्यापक गोविंद बोदेमवाड, पर्यवेक्षक राजीव अंबेकर, ज्योती सिरसाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करन्यात आले. त्याच्या यशाबद्दल संस्थेचे संचालक कार्यकारी मंडळ व सर्व शिक्षक ,शिक्षिका व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांनी चे अभिनंदन केले.