स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बेरोजगार उमेदवारांसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन -NNL


नांदेड|
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्राच्यावतीने नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी सोमवार 14  नोव्हेंबर व मंगळवार 15 नोव्हेंबर 2022 रोजी महास्वयंम या संकेतस्थळावरून ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. 

नामांकित कंपनीच्यावतीने बेरोजगार उमेदवारांना या मेळाव्यात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ऑनलाईन मुलाखती घेण्यात येणार आहेत. किमान शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी व कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या रोजगार मेळाव्यास जास्तीत जास्त ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या  http://mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर रोजगार इच्छुक उमेदवारांना जॉब सिकर या लिंकवर नोंदणी करावी. जॉब सिकर ऑप्शन या लिंकवर क्लिक करुन आपल्या युजरनेम व पासवर्डचा वापर करुन लॉगीन करावे. प्रोफाईल मधील पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या लिंकवर क्लिक करावे. रोजगार मेळाव्याचा नांदेड जिल्हा निवडून फिल्टर या बटणावर क्लिक करावे. नांदेड जिल्हा पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा दिसेल.

त्यातील Action या पर्यायाखाली दोन बटणापैकी पहिल्या बटणावर क्लिक केल्यास मेळाव्याची माहिती दिसेल. तर दुसऱ्या बटणावर क्लिक केल्यास मेळाव्यात उपलब्ध रिक्त पदे दिसतील. सदर संदेश काळजीपूर्वक वाचा व I Agree बटणावर क्लिक करावे व मेळाव्यात उपलब्ध रिक्त पदे (पदाचे नाव, शैक्षणिक अर्हता, आवश्यक कौशल्य, अनुभव, वयोमर्यादा, आरक्षण )दिसतील. आपल्या शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, कौशल्ये यानुसार पदाची निवड करावी व  अप्लाय बटणावर क्लिक करावे. 

आपल्याला एक संदेश दिसेल, सदर संदेश काळजीपुर्वक वाचा व ओके बटणावर क्लिक करावे. आपला रोजगार मेळाव्यामध्ये ऑनलाईन सहभाग नोंदविला जाईल अशा प्रकारचा संदेश दिसेल. कंपनीचे प्रतिनिधी आपल्याशी ऑनलाईन (स्काईप, व्हॉटसॲप ईव्दारे) संपर्क साधून आपली ऑनलाईन मुलाखत घेतील. अधिक माहितीसाठी रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा  दुरध्वनी क्रमांक 02462-251674 किंवा nandeddrojgar@gmail.com वर संपर्क साधावा, असेही आवाहन रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी