मुखेड, रणजित जामखेडकर| महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्या मुखेड तालुका सचिवपदी ग्रामसेवक सतीश गायकवाड यांची सर्वानुमत्ते बिनविरोध निवड करण्यात आली.
मुखेड पंचायत समिती कार्यालयात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्या तालुका शाखेची बैठक तालुकाध्यक्ष कृष्णा रामदिनवार यांच्या अध्यक्षेतेखाली व ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बि.डी.पाटील, जिल्हा उपाध्यक्ष नजीर सय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.या बैठकीत तालुका सचिव म्हणून ग्रामसेवक सतिश गायकवाड यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी ग्रामसेवक संघटनेचे राज्य प्रतिनिधी पी.जे.नागेश्वर, गटविकास अधिकारी मिथुनकुमार नागमवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी शंकरराव येवते, विस्तार अधिकारी पि.एन.गर्जे व मुखेड तालुका ग्रामसेवक संघटनेचे सर्व पदाधिकारी,कार्यकारणी सदस्य व ग्रामसेवक, ग्रामसेविका उपस्थित होते गायकवाड यांची सचिवपदी निवड झाल्याबद्दल सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.