नांदेड| प्रवाश्यांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने तिरुपती येथून नांदेड करिता दिनांक 12 नोवेंबर-2022 रोजी विशेष गाडी ची एक फेरी करण्याचे ठरविले आहे.
1. गाडी क्रमांक 07424 तिरुपती ते नांदेड विशेष गाडी : गाडी संख्या 07424 तिरुपती ते हुजूर साहिब नांदेड ही विशेष गाडी तिरुपती येथून दिनांक 12 नोवेंबर-2022 ला शनिवारी दुपारी 15.30 वाजता सुटेल आणि धोने, काचीगुडा, निझामाबाद मार्गे नांदेड येथे रविवारी सकाळी 09.50 वाजता पोहोचेल. या गाडीत स्लीपर, वातानुकुलीत आणि जनरल असे 22 डब्बे असतील. गाडीचे थांबे आणि वेळापत्रक सोबत जोडले आहे.