उस्माननगर, माणिक भिसे| उस्माननगर बिट अंतर्गत येणाऱ्या ( नऊ) ९ शाळेतील तीसरी पासून ते बारावी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी दि.१८ नोव्हेंबर रोजी बीट स्तरावर वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्या स्पर्धेतून उत्कृष्ट वकृत्व असलेल्या स्पर्धक विद्यार्थ्यांची तालुका स्तरावर निवड करण्यात आल्याचे केंद्रप्रमुख जयवंतराव काळे यांनी प्रसिध्द पत्रकातून कळविले आहे.
सविस्तर माहिती अशी की, आगामी काळात दि.१७ सप्टेंबर २०२२ ते दि.१६ सप्टेंबर २०२३ दरम्यानच्या कालावधीत मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येते आहे.त्या अनुषंगाने मा.विभागीय आयुक्तांनी सुचविलेल्या कार्यक्रमा अंतर्गत व नांदेड जिल्ह्याच्या लोकप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी मा.वर्षा ठाकूर - घुगे यांच्या सुचनेनुसार आपल्या तालुक्यातील व ग्रामीण भागात मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव निमित्ताने बिटस्तरावर वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.आपल्या स्तराववरुन सर्व शाळांना अवगत करून केद्रस्तारावर बोलावून स्पर्धेचे आयोजन करुन प्रत्येक गटातून निवडलेल्या प्रथम व व्दितीय अशा २-२ विद्यार्थ्यांना तालुकास्तरावर असलेल्या स्पर्धेत सहभागी होण्याची सुचना देण्यात आल्या.
त्याप्रमाणे दि.१८ नोव्हेंबर रोजी उस्माननगर केद्रार्तंगत येणाऱ्या जि. के.प्रा.शाळा ,व जि.प.प्रा.कन्या शाळा, उस्माननगर ,जि.प.प्रा.शाळा लाठ ( खु.) जि.प.प्रा.शाळा तेलंगवाडी ,समता विद्यालय उस्माननगर ,सम्राट अशोक प्राथमिक शाळा उस्माननगर , त्रिमूर्ती मा.विद्यालय उस्माननगर , लालबहादूर शास्त्री वि.संगुचीवाडी ,जि.प.प्रा.शाळा संगुचीवाडी या नऊ शाळेतील तीन गटाची विभागणी करण्यात आली होती.गट( १ ) तीसरी ते पाचवी , गट (२) सहावी ते नवी , व गट (३) नवी ते बारावी अशा गटाची विभागणी करण्यात आली होती. शासनाच्या परिपत्रकानुसार बीट स्तरावर दि.१८ रोजी वकृत्व स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना तालुकास्तरावर निवड करण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषद नांदेड व्दारे नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत.या अनुषंगाने मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांचे कार्य व त्यांच्या आंदोलनांची गाथा घरा घरा पर्यंत पोहचण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र व तालुका स्तरावर वकृत्व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.शाळेतील विद्यार्थ्यासाठी वकृत्व स्पर्धेसाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हा विषय देण्यात आला होता.
या स्पर्धेमध्ये केंद्रातील नऊ शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या वकृत्व स्पर्धेतुन निवडलेल्या तीन गटातून दोन - दोन विद्यार्थ्यांची दि.२४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निबंध व वक्तृत्व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.यामध्ये गट १ तीसरी ते पाचवी या गटातून श्रद्धा शिवाजी कानगुले ( लाठ खु ) वैष्णवी ज्ञानेश्वर टिमकेकर (जि.प.प्रा कन्या शाळा ) सर्वज्ञ गंगाधर घोरबांड ( जि.प.के.प्रा.शाळा उस्माननगर ) गट दुसरा ,सहवी ते दहावी या गटातून कल्याणी विलास कौसल्ये ( समता विद्यालय उस्माननगर) उपाली रमेश सोनसळे ( समता विद्यालय उस्माननगर ) रूद्रश्वर ज्ञानेश्वर गवळी ( सम्राट अशोक शाळा उस्माननगर) तर वकृत्व स्पर्धेसाठी गट क्र १ मधून तीसरी ते पाचवी मधून वैभवी लक्ष्मण माचेवाड ( तेलंगवाडी ) पुंडलिक संतोष घोरबांड ( समता विद्यालय उस्माननगर ) ,गट क्र.२ मधून सहावी ते आठवी गटातुन रूद्रेश्वर ज्ञानेश्वर गवळी ( सम्राट अशोक प्राथमिक शाळा उस्माननगर ) शुभांगी प्रभाकर कुमार ( सम्राट अशोक प्राथमिक शाळा उस्माननगर) गट क्र. ३ , मधील नववी ते बारावी मधून सानिका रविराज लोखंडे ( समता विद्यालय उस्माननगर ) प्रियंका परमेश्वर घोरबांड यांची निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळेतील मुख्याध्यापक सहशिक्षक यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.