उस्माननगर, माणिक भिसे| येथील कष्ठाळु, व सदन शेतकरी तथा समता शिक्षण प्रसारक मंडळाचे अजीवन सदस्य प्रगतिशील शेतकरी श्रीनिवास देशमुख यांना राष्ट्रीय महामार्गावरील कॅनल जवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघात ऐवढा होता की,रोडवर रक्ताचा सडा पडला होता.
श्रीनिवास देशमुख हे दुपारी नेहमीप्रमाणे आपले जवळील एम एच 26 एस ४१०४ या मोटरसायकल वरून घरा कडून शेताकडे जात असताना उस्मान नगर येथील कॅनॉल जवळ येताच एका अज्ञात वाहनाने धडक मारल्याने जागीच मृत्यू झाला. एक सज्जन व मनमिळावू स्वभावाचे मेहनती शेतकरी व्यक्तिमत्त्वा होते.
त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी , एक मुलगा असा परिवार आहे. अत्यंत संयमी व सदन शेतकरी म्हणून परिसरात सर्वपरिचित होते. राष्ट्रीय महामार्गावर अनेक महिन्यापासून अपघाताची मालिका सुरू असून गेल्या एक ते दीड महिन्यापासून अपघात झाल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अनेकांचे संसार उध्वस्त झाले. घरातील करता पुरुष जातो तेव्हा त्या घरावर काय कळा पसरते याचे जिवंत उदाहरण म्हणजे ज्या घरी मृत्यू झाला त्या परिसरामध्ये त्यांची ओळख होती .त्यांच्या या घरच्यांनाच कळते त्यांची व्यथा माहिती आहे .निधनाची बातमी गावात कळताच हळहळ व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय महामार्गावर अपघाताच्या प्रमाणात वाढ झाल्याने प्रशासनाकडून 108 ही रुग्णवाहिका 24 तास उपलब्ध करून देण्यात यावी अशी जनतेतून मागणी होत आहे. नांदेड ते उस्मान नगर राष्ट्रीय महामार्गावर पोलीस चौकी व्यवस्था करण्यात यावी अशी सुद्धा जनतेतून मागणी होत आहे. राष्ट्रीय महामार्गावर अपघाताच्या प्रमाणातील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावी अशी सुद्धा जनतेतून मागणी होत आहे.