नांदेड। शहरातील उडान एज्यूकेशनल अँड सोशल फौंडेशन, नांदेड तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही 15 नोव्हेंबर रोजी विझडम क्लासेस , पवन नगर येथे थोर क्रांतिकारक, जननायक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली . जयंती बाळ गोपाळाच्या साक्षीने बाल दिनाच्या पाश्वभूमी वर उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सोपान मारकवाड काका, रमेश तोटावार काका, श्याम बास्टेवाड सर, शंकर बंतलवाड सर, प्रमोद बास्टेवाड सर, आकाश चटलावार सर, बालाजी पोरडवार सर, आनंद मरेवार सर, सुभाष पडलवार सर, माधव यमलवाड सर, गिरीश भाटे व उडान फौंडेशन चे असंख्य मेम्बर आदी उपस्थित होते. यावेळी मारकवाड काकांनी भागवान बिरसा बद्दल ची प्रेरणा व माहिती व विचार सांगितले आणि आदिवासी घराघरात बिरसा मुंडा जयंती व्हायला पाहिजे असे आवर्जून सांगितले.