भारताचा नकाशाच्या आकारातील, तिरंग्या फुलाचा हार घालून भारत जोडो यात्रेचे केलं समर्थन
नांदेड/अर्धापुर। नांदेडहून भारत जोडो यात्रा हिंगोलीकडे जात असतांना हदगाव-हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह दाखल होऊन महाराष्ट्र राज्य नकाशाच्या आकाराचा फुलांनी बनवलेला मोठा हार घालून खासदार राहुल गांधी यांचे स्वागतकेले आहे.
हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाच्यां वतीने स्वागत करण्यासाठी आणि भारत जोडो यात्रेला समर्थन आणि सहभागी होण्यासाठी शेकडो कार्यकर्ते उपस्थित झाले. यावेळी माजी जी प सदस्य सुभाष राठोड, माजी संचालक रफिक सेठ, हिमायतनगर शहराध्यक्ष संजय माने, प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल भाई, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष फिरोज खान पठाण, माजी तालुकाध्यक्ष जनार्दन तांडेवाड, पंडित ढोणे, वैभव शिंदे, आदींसह हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते, वकील, डॉक्टर, सरपंच, उपसरपंच, पत्रकार उपस्थित होते. सत्कार समारंभानंतर भारत जोडो यात्रा पुढे हिंगोली जिल्ह्यात रवाना झाली. या पदयात्रेत हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह सर्व कार्यकर्ते सहभागी होऊन पायी चालले.