पार्डी व मनाठा येथे शोककळा
अर्धापूर, निळकंठ मदने| तालुक्यातील पार्डी (म) येथील प्रसिद्ध डॉक्टर कैलास मनाठकर यांचा रविवारी रात्री गंगापूर जवळ तिन वाहनांच्या अपघातात दुदैवी मृत्यू झाला. या अपघातात एक जण जखमी झाले असून, सोमवारी सायंकाळी ६ वा.त्यांच्या मुळगावी मनाठा ता.हादगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अर्धापूर तालुक्यातील पार्डी(म) येथील गरीबांचा डॉक्टर म्हणून गावात वैद्यकीय सेवा देणारे खाजगी डॉक्टर व सामाजिक उपक्रमात नेहमी सहभाग घेणारे, शिवजयंतीचे वक्ते डॉ कैलास मनाठकर हे पार्डी येथील तिन मित्रांसोबत शिर्डीला रविवारी सकाळी बंडाळे यांच्या कारने निघाले, औरंगाबादच्या समोर गंगापूर - वैजापूर रस्त्यावर वरखेडजवळ रात्री ७:३० च्या दरम्यान त्यांच्या कार क्र.एम एच ४६ डब्ल्यू ७७३१ ला पाठीमागून एअरटीका कार क्र. एम एच एफ जी ०४०२ ने धडक दिली असता समोर उभ्या असलेल्या ट्रक क्र.एम एच ०४ ईबी ६७१२ या ट्रक वर ही कार आदळून मोठा अपघात झाला.
यावेळी समोरच्या सीटवर डाॅ.कैलास मनाठकर बसले होते,कारची डावी बाजू ट्रकवर आदळल्याने कैलास मनाठकर यांचा या अपघातात दुदैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी,१मुलगा,१मुलगी,भाऊ असा परीवार असून, मुलगी,जावई व मुलगा हे नौकरी करीता परप्रांतात आहेत. याप्रकरणी शिलेगाव ता.गंगापूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी पाठीमागून धडक देणार्या वाहनचाकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, सोमवारी सायंकाळी ६ वा.मनाठा यामुळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.