नविन नांदेड। वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण महानगर अंतर्गत येत असलेल्या मनपा प्रभाग क्र.20 अंतर्गत लूंबिनी नगर वाघाळा येथील शाखेच्या नामफलकाचे अनावरण वंचित बहुजन आघाडीचे नांदेड महानगर अध्यक्ष विठ्ठल गायकवाड यांच्या हस्ते 20 नोव्हेंबर रोजी उदघाट्न करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रवी पंडित,अमृत नरंगलकर, प्रा.विनायक विनायक,सुरेश गजभारे,सुदर्शन कांचनगिरे, विद्यानंद पवळे, डॉ. सिद्धार्थ भेदे, नंदकुमार गच्चे, वॉर्ड अध्यक्ष सुरेश पवळे,शिवाजी कांबळे,राघोजी वाघमारे,संजय निळेकर,राजु जमदाडे,मधुकर वाघमारे, साहेबराव भंडारे, राजू वाघमारे, भागवान गजभारे,इत्यादी मान्यवर उपस्थित होते, यावेळी प्रथम भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाणा पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. प्रमुख पाहुण्याचा लूंबिनी नगर वाशियांकडून सत्कार करण्यात आला ,या वेळी विठ्ठल गायकवाड ,रवी पंडित,विनायक गजभारे,सुरेश गजभारे, अमृत नरंगलकर सूदर्शन कांचनगिरे,यांनी पक्षाचे ध्येय व बाळासाहेब आंबेडकर यांचे आगामी काळात हात बळकट करण्याचे आव्हान उपस्थितांना केले.
या कार्यक्रमाचे प्रसत्ताविक व सूत्रसंचालन राघोबा वाघमारे यांनी तर आभार प्रदर्शन विलास ढवळे यांनी केले यावेळी नगरातील शेकडो महिला, युवक पुरुष उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू जमदाडे, मधुकर कांबळे, प्रकाश पाईकराव, भीमराव वाघमारे, साहेबराव ढवले, लखन गजभारे, सचिन राऊत, राजू राक्षसमारे, निखिल कांबळे, बाबुराव सूर्यवंशी, राजू रक्षसमारे,बबन मोगले,बबलू वाघमारे करुणा ताई कांबळे, लक्षीमीबाई पैठणे, करुणा शिंदे,सुरेखा पवळे इत्यादीनि परिश्रम घेतले.