नांदेड। उदयपूर, राजस्थान येथे इंडियन चेस्ट सोसायटी आणि नॅशनल कॉलेज ऑफ चेस्टफिजिशिअन्स यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या नॅपकॉन 2022 (NAPCON 2022) या वार्षिक संमेलनामध्ये डॉ. चंद्रकांत टरके यांना फेलो ऑफ नॅशनल कॉलेज ऑफ चेस्ट फिजिशिअन्स (FNCCP) ही फेलोशिप बहाल करण्यात आली.
त्यांना ही फेलोशिप श्वसन विकार या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात आली.या वार्षिक संमेलनात संपूर्ण भारतातील आणि विदेशातील हजारो चेस्ट फिजिशिअन्स आणि पलमोनोलॉजिस्ट यांनी सहभाग घेतला होता. भारतात सर्वात कमी वयात ही फेलोशिप मिळवण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे.
तसेच डॉ. टरके यांना या वर्षी एशियन पॅसिफिक सोसायटी ऑफ रेस्पिरॉलॉजी जपान (FAPSR) या आंतरराष्ट्रीय फेलोशिप ने सन्मानित करण्यात आले. डॉ टरके हे मुळचे किवळा, नांदेड येथील असून सध्या अपोलो हॉस्पिटल हैदराबाद येथे सिनियर कन्सलटंट व चेअरमन इंडियन चेस्ट सोसायटी (साऊथ झोन/दक्षिण भारत) या पदावर कार्यरत आहे. त्यांच्या या यशाचे वैद्यकीय, सामाजिक, राजकीय क्षेत्रातुन कौतुक होत आहे.